नांदेड

युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन.


 

नायगाव प्रतिनिधी  – तानाजी शेळगावकर

…………………………………

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ पवित्र कार्य असून रक्तामुळे अनेकांना जीव गमवावा लागला, आणि त्यांच्या कुटुंबात अंधार झालेला आहे. आपल्या या कार्यामुळे एखाद्याचे जीव वाचविण्यासाठी नायगाव विधानसभेचे युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन केले असून आपण जास्तीत जास्त संख्येने रक्तदान द्यावे असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्राला अनेक वेळा रक्ताच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले, मागील वर्षापासून नायगाव विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात रक्तदान घेण्यात आले त्याच धर्तीवर पुनश्च एकदा नायगाव विधानसभेचे युवा नेते रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव उमरी धर्माबाद युवक काँग्रेसने दिनांक नऊ डिसेंबर 2022 वेळ सकाळी आठ वाजेपासून स्थळ मा.आ. वसंतराव पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालय नायगाव येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन केले असून यात जास्तीत जास्त युवकांनी या महारक्तदान शिबिरात रक्तदान द्यावे अशी नम्र आवाहन सदर शिबिरांचे संयोजक माणिक माधवराव पाटील चव्हाण यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »