जिल्हावार्तानांदेड

बँक ऑफ इंडिया नायगाव शाखा व उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांना तीन कोटी 17 लक्ष वितरित…


 

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क –

 

दिनांक 10 सप्टेंबर रोजी नायगाव येथील अंबिका मंगल कार्यालयात बँक ऑफ इंडिया व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती नायगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून 74 समूहांना 3 कोटी 17 लक्ष कर्ज स्वरूपात वितरित करण्यात आलेले आहे

बँक ऑफ इंडिया चा 119 वा वर्धापन दिन व नायगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखेचा 14 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने नायगाव तालुक्यातील उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला स्वयंसहायता समूहांना हे आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला या आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन त्या स्वयं रोजगाराला लागाव्यात व ते उद्योजक म्हणून पुढे यावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उमेदच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक स्तर उंचावला जात आहे म्हणूनच नायगाव तालुक्यातील उमेद अभियानाच्या विभागामार्फत महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचं काम करण्यात आलेल आहे.

सदरील कार्यक्रमाचे आयोजन  बँक ऑफ इंडिया शाखा नायगाव चे  बँक व्यवस्थापक अन्नाराव राठोड तसेच सुनील येरसनवार(फिल्ड ऑफिसर ), प्रभाकर जाधव, धर्मराज सिद्धमवार, लल्लबँक ऑफ इंडियाच्या 119 ला वर्धापन व नायगांव शाखेच्या 14 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विभागीय व्यवस्थापक सोलापूर श्री चंद्रशेखर मंत्री हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजेश कुंटूरकर साहेब  चेअरमन कुंतूरकर शुगर लिमिटेड , तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री गजानन पातेवार साहेब,जिल्हा व्यवस्थापक श्री गणेश कवडेवार साहेब, जिल्हा व्यवस्थापक श्री माधव भिसे साहेब, सहायक प्रादेशिक व्यवस्थापक श्री.विजयकुमार भोसले सर, श्री. श्रीकांत गुरलेवार वरिष्ठ प्रभाकर नांदेड, श्री. प्रमोद संजय वरिष्ठ अधिकारी ,व्हीआयपी रोड नांदेड,

उमेद अभियानातील तालुका अभियान व्यवस्थापक श्री.अमोल जोंधळे, तालुका व्यवस्थापक श्री.इरवंत सुर्यकार, तालुका व्यवस्थापक (आर्थिक समावेशन) श्री.बाबू डोळे, कौशल्य समन्वयक श्री. बालाजी गिरी
बँक सखी महानंदा गायकवाड, मायावती सूर्यकार, शिवमाला पंचलिंगे, हरण्याबाई सुरणे, यांच्या माध्यमातून हे आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात येत आहे
सदरील कार्यक्रमात घोंगडी चे स्टॉल प्रदर्शनी लावण्यात आली होती
या बँक मेळाव्यासाठी प्रत्येक गावातून समूह संसाधन व्यक्ती म्हणून विशेष सहभाग नोंदविला
त्यामध्ये रेखाताई कांबळे, संगीता जाधव,दैवशाला वाघमारे, महानंदा गायकवाड सुनीता बेलूरे, सोनूताई कदम, मीराताई झगडे, ज्योतीताई पोतलवार तसेच समता महिला प्रभाग संघ‌ मांजरमाच्या अध्यक्ष सुनिता उत्तमराव गवाले, सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघ नरसी संघाच्या अध्यक्षा तयबा शेख इलाईज. आदिची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते 3 कोटी 17 लक्षाचा धनादेश 74 समूहा समूहाच्या महिलांना वितरित करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »