नायगावच्या तहसिलदार धम्मप्रिया गायकवाड यांची राहेर परिसरातील नुसकानग्रस्त शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी लवकरच नुकसानीचे पंचनामे करण्याचे दिले आश्वासन…!
नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क
नायगाव तालुक्यातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्याभरात जोरदार झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या बॅक वॉटर मुळे पुराचे पाणी येऊन हजारों हेक्टर शेतीचे हे पिकाचे नुकसान झाले.
या पिकाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा व त्यांचे झालेले नुकसान भरून निघावे अशी नागरिकांची मागणी होती . ती मागणी रास्त असून नायगाव तालुक्याच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी आपली महसूल ची टीम घेऊन राहेर, हुस्सा सांगवी, मेळगाव , परिसराचा दौरा करून शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांच्या पिकाची माहिती घेत तात्काळ तलाठी मंडळ अधिकारी यांना आदेश करत सदर पिकाची पंचनामे सुरू करा अशा सूचना केल्या आहेत . यावेळी नायगाव तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड मंडळ अधिकारी आर के पवार कुंटूर तलाठी डाकेवार राहेर ,तलाठी पांडुरंग हाके, सांगवी धनंज असे सर्व तलाठी व कर्मचारी उपस्थित होते.
हजारो हेक्टर शेतीतील सोयाबीन कापूस मूग उडीद अशा पिकामध्ये गोदावरी नदीच्या बॅकवॉटर पाणी व पावसाचे येणाऱ्या पाण्यामुळे सर्वत्र दोन दिवसापासून पूरस्थिती या परिसरात निर्माण झाली होती . दोन-तीन मंडळाचा पाऊस कुंटूर मंडळात दाखल झाल्याने पूर्ण पुराचे स्वरूप निर्माण झाले होते . हजारो एकर शेतीतील पीक वाया गेले होते.
त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार गायकवाड यांनी बांधावर जाऊन थेट शेतकऱ्यांच्या शेतात माहिती घेत तलाठी मंडळ अधिकारी यांना आदेशित केल्यामुळे आता तरी
प्रशासनाकडून सामान्य शेतकरी व शेतमजूर यांना न्याय मिळेल का हे येणाऱ्या काळात निश्चितच कळणार आहे……