गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त नायगावमध्ये शांतता समिती बैठक संपन्न…!
नायगाव ( रामप्रसाद चन्नावार )
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त कायदा सुव्यवसस्था अबाधित राहावे यासाठी पोलीस प्रसाशनाच्या वतीने नायगाव येथील पोलीस ठाण्याच्या प्रांगणात उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली यावेळी हिंदू व मुस्लिम समाज बांधवाच्या उपस्थित शांतता समितीची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
दि.६ सप्टेबंर २०२४ रोजी नायगाव येथे गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठककिच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी हे होते तर व्यासपिठावर पोलीस निरिक्षक अजित कुंभार,महावितरण कंपनीचे शिंदे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव लंगडापुरे,वैद्यकीय विभागाचे सहाय्यक अधिक्षक,पो.उपनिरिक्षक पडिंत साहेब यासह अनेकजन उपस्थित होते यावेळी उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यांनी कायदा व सुव्यवसस्थेचा प्रश्न कुठे निर्माण होणार नाही याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करून गणेश मंडळाने सुचनांचे काटेकोरपणे पालन करत ध्वणीप्रदुषण बाबद काळजी घ्यावी यासोबतच डिजेला परवानगी नसून कायद्याचे उलंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असे सांगून गणेशोत्सव व ईद- ए-मिलाद शांततेत साजरा करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान केले तर महावितरण कंपनीच्या वतीने शिंदे साहेब यांनी गेणेश विसर्जिनाच्या वेळी गणेश मंडळानी विजेचे तार कुठेही लागणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी महावितरण कंपनीच्या वतीने सर्व उपाय योजना करण्यात येत असून आमचे कर्मचारी चोवीस तास सेवेत हजर राहतील असे म्हणाले तर गणेशोत्सव शांतेत पार पाडण्यासाठी ईद ए मिलाद साजरा करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने पाच दिवस पुढे ढकलला असल्याचे करिम चाऊस यांनी मुस्लिम समाजाच्या वतीने जाहिर केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भालेराव,पो.पा.भांगे,पो.पा.वारघडे, नगरसेवक दयानंद भालेराव,भा.ग.मोरे सर,शिंदे सर,युसूफ भाई,जुनैद पठाण,मारोती कत्तुरवार,करिम चाऊस,सय्यदभाई मुल्ला,सर्व गावचे सरपंच,पोलीस पाटील,श्री गणेश मंडळांचे अध्यक्ष,हिंदू, मुस्लीम समाजातील प्रतिष्ठीत नागरीक व नायगाव पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वसंत माने यांनी केले.
गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद एकाच दिवसी असल्याने हिंदू व मुस्लिम समाजात सलोखा राहावा व गणेश विसर्जनासाठी कोणताही अडथडा येऊ नये यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने ईद ए मिलाद साजरा करण्याचा निर्णय पाच दिवस पुढे ढकलला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते करिम चाऊस यांनी मुस्लिम समाजाच्या वतीने जाहिर केले यामुळे उपस्थितांनी मुस्लिम समाजाचे अभिनंदन करून टाळ्या वाजवले.
उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली नरसी व नायगाव या दोन्ही ठिकाणी शांतता समितीची बैठक संपन्न झाली
यावेळी पो.नि.अजित कुंभार,सपोनि.श्रीधर जगताप,पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे,एम.एल.परगेवार,पो.कॉ.साई सांगवीकर,पोलीस उपनिरीक्षक पंडित साहेब,वळगे साहेब,कुलकर्णी साहेब,पो.हे.कॉ.जांभळीकर,पो.हे.कॉ.
सूर्यवंशी,पो.हे.कॉ.शेख,पो हे.कॉ.शिंदे यासह नायगाव व रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.तर
नरसी येथील शांतता समितीच्या बैठकीला नायब तहसीलदार येरावाड,भास्कर पाटील भिलवंडे,नयूम पटेल,माधव कोरे,विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष ,पो.पाटील व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.