मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी नायगांवमध्ये पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे शनिवारी आयोजन..

117

 

नायगांव / प्रतिनिधी –  रामप्रसाद चन्‍नावार.

 

मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी उपक्रमशील असलेल्या नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतिने पत्रकार आरोग्य तपासणी शिबीराचे येत्या ३ डिसेंबर रोजी अष्टविनायक हाॅस्पीटल,नायगांव बा.येथे आयोजन करण्यात आलेले असून तालुक्यातील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुकाध्यक्ष गजानन चौधरी यांनी केले आहे.

- Advertisement -

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष,माजी आ.वसंतराव पाटील चव्हाण यांच्या शुभहस्ते या शिबीराचे उदघाटन होणार असून बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चित चांडक, तालूका आरोग्य अधिकारी डाॅ.आनंत पवितवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.आर.एच.गुंटूरकर,डाॅ.साईबाबा अंकुशकर हे यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर यांच्या अध्यक्षतेखालील या शिबिराला मा.जिल्हा उपाध्यक्ष तथा, तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे,प्रभाकर लखपत्रेवार, गंगाधर पाटील भिलवंडे,मनोहर तेलंग आदी मान्यवर प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. 

 

समाजाच्या आरोग्याची काळजी घेतांना पत्रकारांनी स्वतःचे आरोग्य जपणे तेवढेच महत्वाचे असल्याने मराठी पञकार परिषदेचा वर्धापन दिन दरवर्षी राज्यभरात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा केला जातो.असा उपक्रम राबविणारी ही देशातील पहिली व एकमेव संघटना असून यंदा राज्यभरातील दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणीचा संकल्प असून या तपासणीतून कोणी गंभीर आजारी असल्यास मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखालील सरकारी आरोग्य कक्ष तसेच,परिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख दीपक कैतके यांच्या माध्यमातून पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने जास्तीत-जास्त पत्रकार व त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून एकाच दिवशी तालुका व जिल्हा संघांनी करावी असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर, विश्वस्त किरण नाईक व अध्यक्ष शरद पाबळे यांनी केले होते. त्याच अनुषंगाने परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी,माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी, माजी विभागीय सचिव प्रकाश कांबळे,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, मा.जिल्हाध्यक्ष ॲड.प्रदिप नागापूरकर,मा.जिल्हा उपाध्यक्ष तथा,तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायगांव तालुका मराठी पञकार संघाच्यावतिने पत्रकारांची आरोग्य तपासणी येत्या दि.३ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वा.नांदेड-हैद्राबाद आंतरराज्य महामार्गावर असलेल्या अष्टविनायक हाॅस्पिटल,नायगांव बा.येथे करण्यात येणार आहे.

या शिबीरात तालुक्यातील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, व सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.