२५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई तातडीने देण्याचे जिल्हाधिकारी यांचे विमा कंपनीला निर्देश.
नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
नांदेड जिल्ह्य़ामध्ये अतिवृष्टी मुळे ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान दिसून आलेले आहे.
त्यामुळे नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम तातडीने सोयाबीन, कापुस, ज्वारी व तूर या पिकाचा विमा भरलेल्या जिल्ह्य़ातील सर्व शेतक-यांच्या खात्यात जमा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी युनायटेड इन्शुरन्स कंपनीला दिले.
जिल्हा स्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यासंदर्भात कंपनी स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले.