जिल्हावार्तानांदेड

पत्रकार हा समाजाचा आरसा आहे – सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक 


 

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी- तानाजी शेळगावकर

मराठी पत्रकारांची मातृ संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 84 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेडच्या नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे .

या पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नायगाव नगरपंचायतचे नगरसेवक युवा नेते पंकज पाटील चव्हाण यांची उपस्थिती होती . त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून नायगाव ग्रामीण रुग्णालयाचे अध्यक्ष हनुमंत गुंटूरकर , नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर , डॉक्टर साईबाबा अंकुशकर ,डॉक्टर श्रीकांत भोसकर ,डॉक्टर गुलाबराव वडजे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी , यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश हनमंते यांनी केले तर माजी जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर म्हणाले की भविष्यात पत्रकार संघाने पत्रकारासह पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा आरोग्य शिबिराच्या आयोजन करावे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपाधीक्षक चांडक म्हणाले की पत्रकार हा समाजाचा आरसा असून  पत्रकार, पोलीस प्रशासन, पब्लिक, एकत्र येऊन समाज घडवू शकतो पत्रकारांच्या कोणत्या अडचणीला माझी मदत लागल्यास आवर्जून मदत करेल असे ते म्हणाले.

अष्टविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर साईबाबा अंकुश कर म्हणाले की येणाऱ्या काळात पत्रकारांच्या कुठल्याही अडचणीला मी सदैव तत्पर सेवेत राहील असे पत्रकारांच्या आरोग्य शिबिरात आपले मत व्यक्त केले.

उपस्थित पैकी डॉक्टर गुंटूरकर व तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी माजी जिल्हा अध्यक्ष श्री सूर्यकांत दादा सोनखेडकर यांनी या शिबिराला मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांनी केले.

ग्रामीण भागातून कुंटूर बरबडा मांजरम नरसी शंकरनगर यासह ग्रामीण भागातून आलेल्या सर्व पत्रकारांची ईसीजी बीपी शुगर ही यासह आरोग्य तपासणी करण्यात आली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला 59 पत्रकारांच्या आरोग्य तपासणीमध्ये शुगर ,बीपी, इसीजी, तपासणीचे डॉक्टर साईबाबा अंकुशकर, डॉक्टर गंगाधर बाबर, डॉक्टर मजगे, बालाजी लोलमवाड, शिवशक्ती इंगळे, यादी कर्मचाऱ्यांनी या शिबिरात मोलाचं सहकार्य केले विकास भुरे, सहसचिव रामप्रसाद चन्नावार, गोविंद नरसीकर, कैलास तेलंग, पंडित वाघमारे, रामराव ढगे, किरण वाघमारे, शेषेराव कंधारे, श्याम गायकवाड, प्रकाश महिपाळ , शेेेेेेषेराव बेलकर, साहेबराव धसााडे, परमेश्वर जाधव ,भगवान शेवाळे, यशवंत मोरे ,मनोहर मोरे , बालासाहेब शर्मा, आनंदराव सूर्यवंशी,धम्मा भेदे, हनमंत वाडेकर, तानाजी शेळगावकर, मारोती बारदेवाड, शिवाजी कुंटूरकर, अनिल कांबळे , बालाजी हनमंते ,दिगंबर झुंबाडे, हनमंत चंदनकर, धम्मदीप भद्रे, बालाजी रानडे, आनंदराव डाकोरे, अंकुश देगावकर, तालुक्याचे सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »