…अखेर बहुचर्चीत मेळगाव ग्रामपंचायतीच्या चौकशीला मुहूर्त सापडला !
नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क….
तालुक्यातील बहुचर्चित मेळगांव ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक एन.एस.यरसनवार यांच्या कार्यकाळातील कामांची द्विसदसीय चौकशी समितीला उशिराने का असेना आज दि.१५ सप्टेंबर रोजी जणू मुहूर्तच सापडला असून त्यांनी येथील विविध कामांची भौतिक स्थळ पहाणी व तपासणी करुन पंचनामा केला असल्याने या प्रकरणात संबधित तत्कालीन ग्रामसेवकासह त्यांना पाठीशी घालणारे गटविकास अधिकारी यांच्यावरही वरिष्ठांकडून कायदेशीर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले असल्याने व या चौकशीदरम्यानचा निर्माण झालेले वाद-विवाद कुंटूर पोलिस ठाण्यातील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यतत्परमूळे निवळल्याने तालुक्यात पून्हा एकदा या प्रकरणात चर्चेला रंग भरला आहे.
सविस्तर वृत्त असे की, ग्रा.पं.मेळगांव चे तत्कालीन ग्रामसेवक एन.एस.यरसनवार यांनी आपल्या कार्यकाळात सरपंच मोहन धसाडे यांच्या कोरे चेकबुकवर तसेच, त्यांच्यासह तब्बल चार ग्रामपंचायत सदस्य यांच्याही मासिक व ग्रामसभांच्या कोऱ्याच रजीस्टरवर स्वाक्षरी घेतल्या होत्या.
याबाबत विनंतीनंतरही ते सदर सभांचे विषय व ईतिवृत्त माहिती देत नव्हते यासह विविध योजनानिहाय विकास कामे हस्तकांकडून दर्जाहीन व कागदोपत्रीच पूर्ण करुन घेत होते. स्थानिक जनतेला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवून विविध वैशिष्ट्यांतून ते मनमानी कार्यपद्धतीबाबत अवलंबित कर्तव्यात कसूर करित होते.
याबाबत सरपंच मोहन धसाडे यांच्यासह चार ग्रामपंचायत सदस्य यांनी नायगांव पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केल्यानंतर तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांकडून याप्रकरणात द्विसदसीय चौकशी समितीकडून सात दिवसांत चौकशीसह दोषींवर कायदेशीर कारवाई करु असे लेखी आश्वासन दि.२६ जून रोजी देण्यात आले होते व सदरील ग्रामसेवकाची तडकाफडकी बदली करुन वाय.एच.सुर्यवंशी यांना तातडीने पदभार देण्याचे आदेश दिले होते.
मात्र पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी शेख लतिफ व गटविकास अधिकारी एल.आर.वाजे यांच्याशी संगनमत करून पदभार देण्यास चालढकल चालविली होती. तक्रारकर्ते यांनी पुनश्च आंदोलनाचा पावित्रा घेताच अर्धवट पदभार देऊन सदर ग्रामसेवकाच्या बदलीसाठीही नियमबाह्य प्रताप घडविला होता.
सोबतच, चौकशीसाठी आपल्याकडील अभिलेखे व दस्ताऐवज नियुक्त द्विसदसीय चौकशी समितीला दिलेच नसल्याने व त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडून त्यांना पाठबळ मिळत असल्यामुळे थेट त्यांच्यावरच कारवाईसाठी सरपंचासह चार ग्रामपंचायत सदस्यांनी दि.६ सप्टेंबर रोजी जि.प.नांदेड कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसल्यानंतर वरिष्ठांकडून प्रदान केलेल्या अधिकारानुसार या प्रकरणात गटविकास अधिकारी एल.आर. वाजे यांनी कार्यवाही केली नसल्याचा ठपका ठेवून याबाबत त्यांना जाब विचारुन थेट आपल्याविरोधात वरिष्ठांकडे प्रशासकीय कार्यवाही का प्रस्तावित करण्यात येऊ नये ? याबाबतचा खुलासा २४ तासात समक्ष सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधिर ठोंबरे यांनी दिले होते.
विशेष बाब म्हणजे स्वतः कारवाईच्या कचाट्यात सापडलेले असतांनाही संबधित दोषी तत्कालीन ग्रामसेवकावर काहीच कारवाई केली नाही मात्र त्यांच्या कार्यकाळातील अभिलेखे व दस्ताऐवज द्विसदसीय चौकशी समितीला उपलब्ध करुन देण्याची कर्तव्यतत्परता दाखवल्यानंतर आज विस्तार अधिकारी जी.बि. कानोडे व कनिष्ठ अभियंता एम.ए.जिरवनकर यांनी जणू मुहूर्तच शोधून संबधित दोषी तत्कालीन ग्रामसेवकाकडूनच त्यांच्या समक्ष माहिती घेत गांवातील विविध कामांची स्थळ पहाणी, भौतिक तपासणी केली.
महत्वाची बाब म्हणजे द्विसदसीय चौकशी समितीनेही आज चौकशीवेळी कामनिहाय तांत्रिक तपासणीला त्यांच्याकडील उपलब्ध अभिलेखे व दस्ताऐवज सोबत आणलेच नसल्याने त्यांना तक्रारदारांनी चांगलेच धारेवर धरल्याने संबधितांसह दोषींची पाठराखण करणारे यांचा पूर्वनियोजित वाद-विवाद निर्माण झाला होता.
परंतू, कुंटूर पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहा.पोलिस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशीदरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांनी योग्यतेने कर्तव्य बजावत संबधितांना आगामी कार्यवाहीची जाणीव करुन दिल्यानंतर दोषी तत्कालीन ग्रामसेवक महाशयांचे पाठीराखे असलेले स्थानिक प्रस्थापित राजकीय पुढारी हताश झाले तर, नरमलेल्या समितीने विविध कामांची स्थळ पहाणी व तपासणी करुन पंचनामा केला परंतू, तक्रारीतील बाबनिहाय चौकशी केलीच नाही.
या चौकशीत तत्कालीन ग्रामसेवक एन.एस.यरसनवार यांनी आपल्या कार्यकाळात योजनानिहाय लाखो रुपयांची उचल केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान पूर्ण चौकशीअंती लवकरच पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठस्तरावर अहवाल प्रस्तावित करु असे मोघम उत्तर देत चौकशी अधिकारी कानोडे यांनी उपस्थित पत्रकारांशी अधिक बोलणे टाळले.
यावेळी येथील ग्रामसेवक वाय.एच.सुर्यवंशी, कुंटूर पोलिस ठाण्याचे शेख शबीर, सरपंच मोहन धसाडे, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री माधव शिंदे, गंगाधर कंदरवाड, सौ.भारतबाई महिपाळे, स्थानिक व परिसरातील नागरिक व पत्रकार मंडळी उपस्थित होते.