IQAC च्या वतीने नॅकसंबंधी ऑनलाईन मार्गदर्शन संपन्न.
नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
येथील शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये IQAC च्या वतीने नॅकच्या पुर्वतयारीसाठी 7 व 8 जानेवारी 2022 या दोन दिवसीय ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी परांडा जि. उस्मानाबाद येथील एस.जी.आर.जी.शिंदे गुरुजी या ग्रामीण महाविद्यालयातील प्रा.डॉ. महेशकुमार माने यांनी नॅक संबधीत सात क्राईटएरियावाईज मार्गदर्शन केले.डॉ. माने यांनी प्रत्येक क्राईटएरिया अतिशय सुक्ष्म पध्दतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेष म्हणजे त्यांचे स्वतःचे महाविद्यालय हे ग्रामीण भागामध्ये आहे आणि त्यांनी C ग्रेडवरून एकदम A ग्रेड मिळविला आहे त्यासाठी करावी लागणारी जिद्य आणि चिकाटी यासंबंधी अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. विशेष कौतूक करण्यासारखी बाब म्हणजे डॉ.माने सरांनी विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयातील तासिका घेण्याचे काम संपवून दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये सलग वरील दोन दिवस अतिशय उत्साहाने मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नॅकचे अवघड वाटणारे काम शरदचंद्र महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापक, प्राध्यापिका यांना अतिशय सोपे वाटायला लागले असून ते स्वंय प्रेरणेने झटून कामाला लागले आहेत. डॉ.माने सरांच्या मार्गदर्शनामुळे आतापर्यन्त अनेक महाविद्यालयांना नॅकच्या वतीने चांगले गुण मिळाले असल्याचीही माहीती त्यांनी दिली. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरीबाबू, IQAC चे समन्वयक प्रा. अमितकुमार पांडे, उपप्राचार्य डॉ. शाम पाटील, नॅक समन्वयक प्रा.डॉ. वैभव कवडे या सर्वांनी टेक्निकल सेशन सांभाळून सर्व प्राध्यापकांना डॉ.माने सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवून दिला. या सेमिनारमध्ये प्रत्येक क्राईट एरियाशी संबंधीत प्राध्यापकांनी आपल्या शंका विचारल्या व त्यांचे योग्य समाधान डॉ.माने सरांनी केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांनी केले तर आभार IQAC चे समन्वयक प्रा. अमितकुमार पांडे यांनी मानले.