डॉ.मिनलताई पाटील खतगावकर नायगाव विधानसभा निवडणुक काँग्रेसकडून लढवणार…..
नायगाव ( रामप्रसाद चन्नावार )
माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शंकरनगर तालुका बिलोली येथे बिलोली देगलूर नायगाव उमरी धर्माबाद यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत नायगाव विधानसभा निवडणूक डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्षाकडून लढवावी असा सर्वानुमते ठराव घेण्यात आला असून बिलोली देगलूर विधानसभेत जो उमेदवार दादा देतील तो उमेदवार देखील निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्याकडून प्रयत्न केले जातील असा एकमुखी या वेळी ठराव घेण्यात आला.
सामान्य जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजे यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाऊन पक्षश्रेष्ठीने जो आदेश देईल तो मान्य करत आम्ही पक्षाचे प्रामाणिक कार्य केले परंतु पक्षाकडून आमचा व कार्यकर्त्यांचा कसलाही विचार केला जात नसल्याने कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर नायगाव विधानसभा निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असताना खासदार वसंतरावजी चव्हाण यांचे दुःखद निधन झाले असता काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून सर्वानुमते प्रा. रवींद्र वसंतरावजी चव्हाण यांना पुन्हा लोकसभेत पाठवण्यासाठी सर्वानुमते ठराव घेण्यात आला भाजपाकडून आम्हाला रवींद्र पाटील चव्हाण यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवावी असे सांगण्यात आले असताना चव्हाण कुटुंबीयांच्या विरोधात आम्ही कोणतीही निवडणूक लढवणार नाही असे आम्ही स्पष्ट सांगितले.
चव्हाण कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख आणि नांदेड जिल्हा पोरका झालेला असताना अशा दुःखद प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य समजून खतगावकर कुटुंबीय देखील प्रा.रविंद्र पाटील चव्हाण यांना साथ देण्याचे ठरवले असल्याचे सांगितले.
भास्करराव पा. खतगावकर अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले की आज पर्यंत सत्तेसाठी मी कोणापुढे न जाता जनतेच्या प्रेमावर ४० वर्ष सत्तेत होतो तेव्हा मी कोणत्याही एका विशिष्ट समाजाचा नव्हतो तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार काम करणारा लोकप्रतिनिधी होतो. मी जे काम केलं त्याची पोचपावती म्हणून आज माझ्यावर प्रेम करणारी ही जनता आहे आणि जनता हीच माझी संपत्ती आहे असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू गंदिगुडे यांनी केले तर प्रा. जिवन चव्हाण,
डॉ.रतनाळिकर, भिमराव जेठे कु.भावना दासेटवाड, संभाजी पाटील शिंदे,बाळु मुदखेडे, गणपतराव पाटील धुपेकर, नागनाथराव अनंतवाड , शेख गौश रामतीर्थकर,दिंगाबर हजारे, मेहताप पठाण, मारोती पटाईत, गंगाधर गायकवाड मोकळीकर, आनंदराव बिराजदार गुरुजी, साईनाथ सोमठानकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. मिनलताई खतगावकर यांच्या हस्ते श्री साईबाबांची महाआरती करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरवातीला कै शंकररावजी चव्हाण,कै.वसंतराव चव्हाण,कै.मधुकरराव पा खतगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी जि.परिषदेचे अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर,माजी उपमहापौर सरजीत सिंग गिल,माधवराव सुगावकर,बाळासाहेब पाटील खतगावकर,मसूद देसाई,पत्रकार संजीव कुलकर्णी,मिसाळे गुरुजी,शिव पाटील येसगीकर,डॉ.रत्नाळीकर,दीपक पावडे,प्रताप पाटील जिगळेकर, बी.पी.नारोड,मंगल देशमुख,बाबाराव पाटील भाले, गणपतराव पाटील धुपेकर,एकनाथ पाटील वडगावकर,भीमराव जेठे,एन. डी.पवार,जयराम पाटील बाभळीकर,नंदू पाटील रातोळीकर,मोहित पाटील सूगावकर,साईनाथ पाटील नीवळे,नागनाथ अनंतवाड,शिवाजी पाटील जाधव कुष्णूरकर, दत्तहरी पाटील कावलगुडेकर,सुरेश पाटील खंडगावकर,बाळासाहेब मुदखेडे, दिनू पाटील,आनंदराव बिराजदार गुरुजी,पत्रकार मनोज बुंदले,संभाजी पा.शिंदे मांजरमकर, प्रा.जीवन चव्हाण,मनोज पा. शिंदे,मारोती पटाइत,सोनाली हंबर्डे,भावना दाशेटवार,वालियोडद्दीन फारुखी,संतोष पाटील पूयड,तिरुपती पाटील जाधव यांच्यासह जिल्ह्यातून बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.