मौजे हुस्सा येथे श्री चक्रधर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी…..
नायगाव प्रतिनिधी -अशोक वाघमारे.
नायगाव तालुक्यातील मौजे हुसा येथे संत श्री चक्रधर स्वामी यांची जयंती ग्रामपंचायत हुस्सा च्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
श्री चक्रधर स्वामी यांचे बारावा शतकातील संत परंपरेत महत्त्वाचे योगदान असून त्यांचे लिळा हे आजतगत अजरामर असून त्यांचे विचार हे धर्माचे आचरण व मानव मोक्ष प्राप्तीसाठी असलेले कार्य हे अतिशय महत्त्व असून आणि हुस्सा येथील संपूर्ण गाव हे महानुभाव पंथी असून येथे श्री चक्रधर स्वामी यांच्या विचारधारेवर व श्री गोपाल कृष्ण श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभू यांच्या विचारधारेवर आणि त्यांच्या विचारांशी अनुयायी मोठ्या प्रमाणात असून महानुभाव पंथावर असलेली श्रद्धा निष्ठा हे हुस्सा येतील महानुभाव पंथीय लोक जपत आहेत. म्हणून श्री चक्रधर स्वामी यांचे महाराष्ट्रामध्ये संत परंपरेमध्ये मोठे योगदान असून त्यांच्या कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये दरवर्षी जयंती साजरी करण्याचे आदेश करण्यात आले असून त्याच अनुषंगाने हुस्सा येथील ग्रामपंचायत मध्ये श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. दरम्यान ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री पेनेवार साहेब, सरपंच प्रतिनिधी श्री रमेश पाटील हंबर्डे, अशोक पाटील हंबर्डे गंगाधर पाटील हंबर्डे, यशवंतराव पाटील हंबर्डे गंगाधर पाटील, जयवंतराव पाटील बापूराव पाटील हंबर्डे, गणपत पाटील हंबर्डे, नंदकिशोर धोंडीबा पाटील हंबर्डे,भगवान खामनेकर, आबाजी पाटील हंबर्डे चक्रधर पाटील हंबर्डे, आनंदराव पाटील हंबर्डे, शंकर दत्ताराम पाटील हंबर्डे, गजानन पाटील हंबर्डे, बालाजी पाटील हंबर्डे, शिवाजी वाघमारे, महादेवराव तेलंगे यासह गावातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.