जिल्हावार्तानांदेड

२५ हजाराची लाच घेताना  कंत्राटी ग्रामसेवक कदम चतुर्भूज , लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


 

नायगाव :

प्लाटचा फेरफार लावण्यासाठी २८ हजाराची मागणी करुन २५ हजार रुपये खाजगी व्यक्ती विठ्ठल माने यांच्या मार्फत स्विकारणारे घुंगराळा येथील कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सदरची घटना दि. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. खाजगी व्यक्तीसह ग्रामसेवकास ताब्यात घेतले असून नायगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

निळेगव्हाण येथील रावसाहेब जाधव यांचे घुंगराळा येथे दोन प्लाट असून. त्या प्लाटचा फेरफार लावण्यासाठी घुंगराळा येथील कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम ३० हजाराची लाच मागितली. सध्या ले आऊट नसलेल्या प्लाटची खरेदी विक्री बंद असून. मधला मार्ग काढून अनेकजन १०० रुपयाच्या बाँड पेपरवर शपथपत्र देवून फेरफार करुन घेत आहेत. अशाच प्रकारच्या प्लाटचा फेरफार करण्यासाठी कदम यांनी निळेगव्हाणच्या जाधव यांना ३० हजाराची लाच मागितली. पण सदरच्या प्लाट धारकाने एवढी रक्कम जास्त होते कमी करा अशी विनंती केली असता. खरेदी करण्यासाठी तुम्हाला याच्यापेक्षा जास्त पैसे लागतात याचा विचार करा असे म्हणून रक्कम कमी करण्यास नकार दिला.

निळेगव्हाणचे प्लाटधारक जाधव तडजोड करुन २५ हजार रुपये देण्याचे ठरले. पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले होते. त्यावरून आजच दि. ०३/१२/२०२१ रोजी हेडगेवार चौक, नायगांव परिसरात लावण्यात आलेल्या सापळया दरम्याण खाजगी इसम विठ्ठल माने यांनी तक्रारदार कडुन उपरोक्त कामासाठी २५ हजार लाचेची रक्कम स्विकारली आहे. म्हणुन लोकसेवक (१) म्हैसाजी आनंदराव कदम, वय ३९ वर्ष, व्यवसाय नोकरी ग्रामसेवक, ग्रामपंचायात कार्यालय घुंगराळा ता. नायगांव जि. नांदेड रा. पिपंळगाव, ता. नायगांव जि. नांदेड (२) खाजगी इसम विठ्ठल देविदास माने, वय ३२ वर्ष, व्यवसाय फुल विक्रेता, रा. पिपंळगाव ता. नायगांव जि. नांदेड यांचे विरूध्द पोलीस ठाणे नायगांव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. राहुल खाडे, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद अतिरिक्त पद्भार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड पोलीस उप अधिक्षक श्री धरमसिंग चव्हाण, श्री राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री दत्ता केंद्रे, पोहेकॉ किशन चिंतोरे, पोना हणमंत बोरकर, ईश्वर जाधव, शेख मुजीब यांनी पार पाडली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »