एक वर्षापासून बॅंकेला चकरा मारुनही पिक कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ

आदमपुरच्या  शेतकऱ्यांचा शंकरनगर एस.बि.आय बँके समोर तिन तास ठिय्या

478

 

 

नायगाव/ शेषेराव कंधारे

         आदमपुर ता.बिलोली येथील शेतकऱ्यांनी जवळपास एक वर्षापासून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रामतिर्थ येथे पिक कर्जासाठी अर्ज करुन देखील अद्याप पिक कर्ज मंजूर करण्यात आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी बॅंकेसमोर तिन तास ठिय्या आंदोलन करीत बॅंक अधिका-यांनी काही दिवसांत पिक कर्ज मंजूर न केल्यास बॅंके समोर तिव्र आंदोलन करनार असल्याचे निवेदन दिले.

- Advertisement -

  आदमपुर ता.बिलोली येथील ७०ते८० टक्के शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाले असून नोव्हेंबर २०२० मध्ये ६०ते ७० शेतकऱ्यांनी रामतिर्थ स्टेट बँकेत कर्जासाठी लागणारे बँक बचत खाते, ओळखपत्र, रहिवासाचा पुरावा, सर्व जमिनींचे सातबारा , होल्डिग, पीक पेरा, पासपोर्ट फोटो, इतर बँकांचे ना-हरकत प्रमाणपत्र,100 रुपयांचे तिन बाॅंन्ड अशी विविध प्रकारची कागदपत्रे जमा करण्यास शेतकऱ्यांना फार वेळ, खर्च आणि कष्ट घेऊन एका वर्षा पूर्वी बॅंकेत जमा केले आहेत.

  शेतकरी अनेक वेळा बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना कर्ज मंजूर झाले का असे विचारले असता अपमानास्पद वागणूक देऊन उडवाउडवीची उत्तरे देतात आणि एखादया शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करण्यात आले तरी संबंधित शेतकऱ्यांना दुबारा १०० रुपयांचा बाॅन्ड बँक अधिकारी मागवत आहेत असे अनेक शेतकऱ्यांचं मत आहे.
कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या धोरणांचा फटकाही नेहमीच सहन करावा लागतो. गतवर्षी अतिवृष्टीच्या नुकसानीपासूनही शेतकरी वंचित आहेत. विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांच्या हातावर तुरीच ठेवल्या आहेत. दरम्यान, दीड वर्षांपासून कोरोना विषाणू संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी यंदा पावसाने चांगली सुरवात केल्याने खरीप हंगामातील पेरणी उसनवारी करून करण्यात आली मात्र हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे दोन वेळा पुरपडी झाली त्यामुळे पिकांचे नुकसान झाले त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असताना रामतिर्थ ता.बिलोली येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकांनी आदमपुर येथील शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करण्यासाठी जवळपास एक वर्षापासून टाळाटाळ करीत आहे.

अनेक वेळा येथील शेतकऱ्यांनी संबंधित अधिका-यांना पिक कर्ज मंजूर झाले का असे विचारले असता तुम्ही जिल्ह्याच्या अधिका-यांना विचारा असे उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिले जात असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देवुन दहा दिवस उलटले तरी संबंधित बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाच्या फाइली मंजूर करण्यात आले नाही

त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी एस.बि.आय बॅंकेच्या समोर तिन तास ठिय्या आंदोलन करीत बॅंकेच्या अधिका-यांनी काही दिवसांत पिक कर्ज मंजूर न केल्यास बॅंके समोर तिव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन बजरंग शिंदे, अरविंद पेंटे, बालाजी डुब्बेवार, बसवंत बिद्राळे, दिलीप इंगळे, बालाजी दंडे, रणजित शिनगारे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.