मानार प्रकल्प अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हुस्सा येथील कालवा ओव्हर फुल होऊन नागरिकांच्या घरात घुसले पाणी……
नायगांव प्रतिनिधी – अशोक वाघमारे
नायगाव तालुक्यातील मौजे हुसा येथील मानार कालवा ओव्हर फुल होऊन नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे.
हा प्रकार मानार प्रकल्प अधिकारी, कर्मचारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे व हलगर्जीपणामुळे घडल्याचे दिसून येत आहे. कारण सध्या परिस्थितीमध्ये होत असलेला सततचा पाऊस यामुळे सदर कालव्यामध्ये पाण्याचा विसर्ग होऊन आणि त्या कालव्यांची रुंदी कमी असल्यामुळे पावसाचे पाणी त्या कालव्यामध्ये मावत नसल्यामुळे त्याचाच परिणाम म्हणून सदर कलवा हा ओव्हरफुल होत आहे.
त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसून घरातील अत्यावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. दरवर्षी ऐन पावसाळ्यामध्ये होत असून या कालव्यांची संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील या कालव्यांची रुंदी व कालवा मजबुती करून देण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी केली असता शासनाने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असून प्रशासन मात्र झोपेच्या सोंगात असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे हुस्सा येतील कालव्यांचे पाणी घाणीचे पाणी असल्याने ते पाणी अक्षरशः नागरिकांच्या घरात घुसत असल्याने नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण होत आहे. आणि सदर कालव्यामुळे गावातील काही नागरिकांच्या शेतांचे सुद्धा अतोनात नुकसान होत आहे सदर कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे शेत जमिनी हे खरडून जात आहेत आणि त्यामुळे पिकांची अतोनात नुकसान होऊन शेतातील पिके हे भुईसुपाट होत आहेत त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित लक्ष घालून सदर कलवा हा मजबूत करून देण्याची मागणी आता गावकऱ्यांच्या वतीने होताना दिसून येत आहे. आणि नागरिकांच्या घरात घुसलेल्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना शासनाकडून त्वरित मदत देण्यात यावी अशी मागणी आता हुस्सा येथील नागरिक करीत आहेत.