शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा -मंगेशजी हांनवटे

153

 

 

 

कुंटुर प्रतिनिधी – अनिल कांबळे

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करावी असे निवेदन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ता. नायगाव च्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहे.

- Advertisement -

आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ बालकांना गुणवत्ता पूर्ण दर्जेदार शिक्षण मिळण्याबाबात आग्रही आहे. तसेच संघटना स्वतः शिक्षकांच्या क्षमता समृध्दी साठी (Capacity Building) प्रशिक्षण आयोजित करत आहे. शिक्षकांच्या हक्काबरोबर कर्तव्याची जाण असणारी आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही संघटना आहे.

            कोरोना कालावधीत शिक्षकांनी “कोरोना योध्दे” म्हणून विविध स्तरावर काम केले आहे. त्याचबरोबर कोव्हिड सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही केली आहे.

परंतु शासन प्रशासन शिक्षकांच्या मुलभूत प्रश्नांना बाबत उदासीन असुन शासन दरबारी शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करून आतापर्यंत ठोस कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे सदरील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटनेला निमंत्रित करून बैठक आयोजित करावी अन्यथा शिक्षकांच्या न्याय मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी
दि.१० डिसेंबर ते २७ डिसेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे टप्याटप्याने धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन असे निवेदन नायगाव तालुका संघटनेतर्फे नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांना देण्यात आले.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष सुरेश रामराम बा-हाळे, सचिव व्यंकटेश भोगाजे, राजेंद्र पा.बावणे, गंगाधर मावले,मंगेशजी हनंवटे, हणमंत वानोळे,राजु भद्रे, पाटील सर, विनायक पवार,डुकरे सर सह आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.