पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांनी नायगाव पोलिस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारला…!
नायगांव प्रतिनिधी – अशोक वाघमारे
नांदेड जिल्ह्यातील काही पोलीसअधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या असून नायगावचे पोलीस निरिक्षक मारोती मुंडे यांची देगलूरला बदली करण्यात आली असून नायगाव पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी रात्रीच घेतला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी जिल्ह्यातील काही ठाणेदारांचे ठाणे तडकाफडकी बदलले आहे. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे काही अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत अशी जोरदार चर्चा असली तरी यात नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांना देगलूर ठाणे बहाल करण्यात आले आहे. त्यांनी दोन दिवसापूर्वीच कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाडसी कारवाई करुन कुंटूर पोलीसांचे पितळ उघडे पाडले होते.
बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना पदग्रहण अवधी नसल्याने त्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे रविवारीच मुंडे यांनी देगलूरचा पदभार घेतला तर नायगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अजित कुंभार रूजू झाले आहेत. नायगाव ठाण्याचा पदभार घेतलेल्या अजित कुंभार यांचे पोहेकाँ साई सांगवीकर व चरकुलवार यांनी तसेच नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रामप्रसाद चन्नावार यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.