जिल्हावार्तानांदेड

खा. राहुल गांधी आज नायगावात दिवंगत खा. वसंतराव पाटील चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार…


नायगांव प्रतिनिधी – अशोक वाघमारे 

काँग्रेस पक्षाचे दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांचे हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबीयांना सात्वान पर भेट 5 सप्टेंबर रोजी खासदार राहुल गांधी व मलिकार्जुन खर्गे यांनी देणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे.

स्व. खा.वसंतराव चव्हाण यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आणि सदर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी 7 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे एर ॲम्बुलन्स द्वारे नांदेडहून हैदराबादला हलविण्यात आले होते. आणि हैदराबाद येथील किमस रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले असता खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांनी मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मोठे मताधिक्य घेऊन नांदेड लोकसभा मतदार संघावर विजय मिळवला होता. खासदार वसंतराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील मोठमोठ्या राजकीय घडामोडी व फोडाफोडी होऊन देखील काँग्रेसचा गड अबाधित राखण्यात मोठे यश मिळवले होते. आणि काँग्रेसचा गड राखण्यात खासदार वसंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान असल्याचे देखील सांगण्यात आले होते. मात्र नियतीने अमान्य केले असून अशातच खासदार वसंतराव चव्हाण यांचा दुर्दैवी उपचारा दरम्यान दि. 26 ऑ. रोजी मृत्यू झाला आहे. आणि त्यांच्यावर नायगाव येथील शासकीय इतमामत दि. 27 ऑ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.आणि या विकास पुरुषास अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर नायगाव नगरीमध्ये लोटला होता. आणि त्याच अनुषंगाने देशाचे नेते खासदार श्री राहुल गांधी व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी येत असून व नायगाव येथे स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची सात्वनपर भेट देणार आणि चव्हाण कुटुंबीयांना झालेल्या पोकळी बदल ईश्वराने त्यांना बळ देऊन चव्हाण कुटुंबीयांचे सत्वान करणार असल्याचे माहिती श्री बेटमोगरेकर यांच्याकडून सांगण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »