हिप्परगा माळ येथील मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

144

नायगाव / शेषेराव कंधारे

हिप्परगा माळ ता. बिलोली येथे
ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष दासवाड हिप्परगेकर व लॉयन्स क्लब नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराला अध्यक्ष म्हणून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे होते तर उद्घाटक व सत्कार मुर्ती म्हणून नवनिर्वाचित आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर
हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रवि पाटील खतगावकर ,सपोनि विजय जाधव,बळवंत पाटील,आनंदराव बिराजदार, जनार्दन बिरादार, गिरिधर पा.डाकोरे, सदाशिव पा. डाकोरे ,संतोष पुय्यड सह आदींची उपस्थिती होती.
प्रस्तावना प्रा.बालाजी डाकोरे यांनी केले तर सुत्रसंचलन शामसुंदर जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष दासरवाड यांनी मानले.
संतोष दासवाड यांनी निस्वार्थ पणे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर आणि नवनिर्वाचित आमदार जितेश अंतापूरकर यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे त्याच्या ह्या नाविन्यपूर्ण समाज उपयोगी कार्यक्रमांचे कौतुक करावे तितके थोडेच असुन असे कार्यक्रम इतर गावातील नागरिकांनी राबविण्यात यावीत यासाठी माझ्याकडून शस्त्रक्रिया केलेल्या सर्व रुग्णांना मोफत चष्मे दिले जाणार असल्याचे अध्यक्षीय भाषणात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर खतगावकर यांनी केले.
सत्कार मुर्ती नवनिर्वाचित आमदार जितेश अंतापूरकर म्हणाले की माझ्या सत्काराचे निमित्त साधून आयोजेकानी राबविण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असून येणाऱ्या काळात गोरगरीब जनतेची सेवा देण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे म्हटले.
ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांना वयोमानानुसार अनेक आजारांना सामोरे जावे लागते. पूर्वी मोतीबिंदू मधुमेह, रक्तदाब, गुडघेदुखी सारखे आजार हे वयाच्या साठी नंतर व्हायचे .परंतु आता हे आजार वयाच्या पन्नासीच्या आतच होत आहेत. त्यामुळे आजारी माणसांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातील नागरिक दळणवळणाची गैरसोय व आर्थिक अडचणीमुळे सहजरित्या दवाखान्या पर्यंत पोहचू शकत नाहीत. म्हणून दुर्लक्षित राहिलेल्या पुरूष व माता भगिनींना सहजरित्या सुविधा मिळाव्यात म्हणून या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक संतोष दासवाड यांनी दिली.
यावेळी राजेश्वर मंदरने, विठ्ठलराव माने, शिवाजी पाटील, विलास पांचाळ, अनिल जाधव, गंगाधर अन्नपलवाड, आल्याबाई मल्लेश पटेकर, रावसाहेब पाटील, बालाजी कुरनापल्ले, आकाश कोकणे, सय्यद खलील, मारोती हेंटे, मुंडकर मारोती ,उत्कर्ष सोंडारे ,चंदरबाई वाघमारे , यशवंत पाटील, अमोल खतगावकर सह आदींची उपस्थिती होती.
या मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जवळपास ४५० गरजु रुग्णांना ची तपासणी करण्यात आले तर कोरोना लसीकरणाच्या अंतर्गत जवळपास ७८ महीला व पुरुषांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.मोफत आरोग्य तपासणी शिबिरांत
लॉयन्स क्लब नांदेडचे डॉ.निलेश खेडगे, डॉ.कृष्णा माडेवार,अगनवाडी सेवीका व गावातील तरुण विकास सोंडारे,ब्रम्हा कांबळे
यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सदाशिव पा.डाकोरे, संतोष दासवाड, गिरिधर पा डाकोरे, अॅड राणवळकर, विकास सोंडारे,दिगाबर सोंडारे, प्रल्हाद पा. डाकोरे, संभाजी राणवळकर, बालाजी राणवळकर,के.जी.राणवळकर,माधव जाधव, राधाबाई सोंडारे, आकाश दासरवाड, देवराव दासवाड, राजेश सोंडारे, केशव राणवळकर, शेषराव दासरवाड उपस्थित होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.