गरिबांच्या घराला मोफत रेती मिळणार का ? नायगाव तालुक्यातील सामान्य जनतेची तहसीलदार यांच्याकडे मागणी.
नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट असलेला सर्वांसाठी मोफत घरे याची अंमलबजावणी योग्य त्या प्रमाणात होताना दिसत नाही.
केंद्र शासनाने सर्वांसाठी मोफत घरी ही योजना जरी राबवायचा विचार केला असला तरी प्रत्यक्षात या योजनेसाठी मिळणारे अनुदान तुटपुंजे ठरते.
या योजनेतून घरकुल बांधकामासाठी ग्रामीण भागात एक लाख वीस हजार रुपये एवढे अनुदान मिळते परंतु प्रत्यक्षात एवढ्या रकमेत घरकुल बांधणे शक्य नाही.
त्यात मटेरियल चे भाव गगनाला मिळाले असल्यामुळे एवढ्या रकमेत घरकुल बांधू शकत नाहीत परिणामी सदरील योजनेचा ग्रामीण भागात बट्ट्याबोळ उडत आहे.
शासनाने 640 रुपये ब्रास रेती नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय काढलेला असला तरी प्रत्यक्षात नायगाव तालुक्यात अजून पर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही किंवा शासनाचा रेती डेपो प्रत्यक्षात नाही, त्यामुळे नायगाव तालुक्यातील लोकांना बांधकाम करताना रेती उपलब्ध होत नाही. या शासन निर्णयाचा नायगाव तालुक्यातील जनतेला तरी काही लाभ होताना दिसून येत नाही.
नायगाव तालुक्यात अनेक रेती घाटाच्या ठिकाणी रेतीचे साठे आहेत व ते साठे गेल्या चार ते पाच वर्षांपासून आहे त्या स्थितीत तसेच आहेत त्यांचा लीलाव होत नाही किंवा ते खरेदी करण्यास कोणीही इच्छूक नाही, असे माहिती घेतली असता समजले.
रेती साठे हे घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे असे वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश असल्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी तहसील प्रशासनाकडून नायगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्यात आली होती.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी 5 ब्रास मोफत रेती देण्याचा शासन निर्णय सुधा आहे त्याच अनुषंगाने तालुक्यातील लाभार्थ्यांना मोफत रेती द्यावी अशी अपेक्षा नूतन तहसीलदार यांच्याकडून घरकुल लाभार्थी करत आहेत…
सद्यस्थितीत नायगाव तहसील प्रशासनाकडे अंदाजे पाच ते सहा हजार ब्रास रेतीचा तिचा साठा आहे, तो साठा सर्वसामान्यांच्या घरकुलासाठी देण्यात यावा अशी मागणी नायगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थी करीत आहेत.
