मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कांडाळा गावात राजकीय पुढा-यानां गाव बंदी व इथुन येत्या निवडणुकीवर बहिष्कार……
नायगाव तालुका प्रतिनिधी :- रामप्रसाद चन्नावार.
सकल मराठा समाज कांडाळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे चुलीत गेले नेते चुलीत गेला पक्ष मराठा आरक्षण एकच लक्ष सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना कांडाळा येथे फलक लाउन गाव बंदी करण्यात आली आहे व सकल मराठा समाज नायगाव तालुक्याच्या वतीने आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना आजी-माजी आमदार आजी माजी खासदार आजी माजी जिल्हा परिषद सदस्य माझी सभापती आजी-माजी पंचायत समिती सदस्य या सर्वांना प्रत्येक गावात येण्यासाठी गाव बंदी केली आहे.
जर कोणी आलं धक्काबुक्की झाली तर ते स्वतः जबाबदार असतील आणि त्यांना आणणारा कार्यकर्ता, व आपण राजकीय कार्यक्रम उद्घाटन सोहळे वाढदिवस व्यवसायिक उद्घाटने ज्या ठिकाणी सामाजिक लोक सर्व जाती-धर्माचे एकत्र येतील असे कोणत्याही ठिकाणी वरील नेत्यांनी येऊ नये व कार्यक्रम घेऊ नये.
फक्त अंत्यविधी कार्यक्रम आणि लग्नाचा कार्यक्रम हे दोनच कार्यक्रम नेत्याला येण्यासाठी सूट राहातील बाकी कुठल्याही कार्यक्रमात कोणताही नेता आल्यास त्याला सकल मराठा समाजाच्या वतीने रुमण्याने ठोकण्यात येईल आणि अनुचित प्रकार घडल्यास तो स्वतः नेता आणि त्याला आननारा कार्यकर्ता ते जबाबदार राहतील संपूर्ण नायगाव तालुक्याला कळकळीची विनंती आहे कुठल्याही नेत्याला कोणीही आणू नये
एक मराठा, एक कोटी मराठा