कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यांना ऊत…
नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क..
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन यां ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते.कारण परिसरात सद्या अवैध धंद्यांना ऊत आला आहे.
महाराष्ट्र शासनाने तंबाखूजन्य पदार्थ गुटखा विक्री वर पूर्णपणे बंदी घातलेली असताना सुद्धा गावोगावी किराणा दुकान पान टपरी यावर सर्रास पने गुटखा विक्री होत आहे तसेच दारू व मटका यांनी तरुण पिढी बरबाद होत आहे आणि परिणामी अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे,लहान मुल देखील या व्यसनाच्या आहारी जात आहेत.
परिसरातील बळेगाव रुई इज्जतगाव राहेर व राज्य महामार्गावरील गावात पान टपरी वर अनेक गावात देशी दारू गुटखा विक्रेत्यांची संख्या वाढत चालली आहे या वाढीचे कारण पन पोलीस प्रशासन आहे संबधित दारु विक्रेते व मटका जुगार चालवणारे यांचे पोलीस प्रशासन सोबत अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे याकडे पोलीस प्रशासन जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची सद्या परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे ..
संबधित दारु विक्रेते व मटका जुगार चालवणारे यांच्यावर पोलीस काय कार्यवाही करतात याकडे परिसरातील सामान्य लोकांचे लक्ष लागून आहे….