जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे नायगाव तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन.

288

 

 

नायगाव/लक्ष्मण बरगे

राज्यात १४ मार्चपासून राज्यातील हजारो शासकीय-निमशासकीय कर्मचारी संपावर गेले. नायगाव – बिलोली तालुक्यातील नायगाव तहसील कार्यालयासमोर शिक्षक ग्रामसेवक महसूल या  कर्मचा-यासह अन्य कार्यालयातील शेकडो कर्मचारी  राज्य शासनाच्या विरोधात जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या घोषणा देऊन ढोल बजाव तीव्र आंदोलन करण्यात आले.. जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संपावर गेलेल्याने सर्वच कार्यालय वसपडल्या सारखी वाटत आहेत .

- Advertisement -

जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी नायगाव तालुक्यातील मंडळधिकारी,ग्रामसेवक, तलाटी, तहसील , पंचायत समिती , आरोग्य विभाग दुय्यम निबंधक कार्यालय, ITI  कर्मचारी , पाठबंधारे विभाग , शिक्षक, अंगणवाडी  कार्यालय  कर्मचारी,सुपर वायकर,  अन्य कार्यालयातील  सर्व शासकीय कर्मचारी ढोल बजाव आंदोलनात उतरल्याने नायगाव तहसील परिसर दणानला होता.

 

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळणार नसेल तर आमदार व खासदार यांचे पगार आणि पेन्शन बंद करा,तसेच” आमदार खासदार तुपाशी,कर्मचारी उपाशी,पेन्शन आमच्या हाकाची,नाही कोणाच्या बाप्पाची,” “आन्दंर की ऐक बात है,तहसील मिडीया हमारे साथ ,या घोषणासह आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या तर सरकार विरोधी अनेक पोवाड्यासह भजन व भाषणे करून सरकारचा निषेध करण्यात आला . आंदोलनात महीलीसह शेकडो कर्मचारी जुन्नी पेन्शन लिहीलेल्या टोप्या  डोक्यावर  घालून आंदोलनात सहभागी झाले होते.

 

या आंदोलनात नायगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टी.जी.पा. रातोळीकर , सचिव सुर्यकांत बोंडले , नागेश यरसनवार , साईनाथ चव्हाण , व्यंकटेश पाटील,सदाशिव आगलावे , यादव सुर्यवंशी,दिलीप खैरनार,निलेश कुलकर्णी  , प्रकाश मामा नैर्लेवाड,बालाजी सुर्यवाड,सौ.अलका मुगटकर, संगीता घुट्टे,हर्षा लाडके,शारदा भाजे,सुजाता शिंदे,  नामदेव जाधव,सोनटक्के एस.एम.,  तलाटी संघटनेचे ता.अध्यक्ष एस.के.मुंडे,आर.जे‌.चव्हाण  श्रीमती एस.आर.बोधगिरे, श्रीमती एस.आर.कुमनाळे,सदाशीव जाधव सर, मंगेश हनवटे, उद्धव ढगे सर,कपील गारटे , ,  ,अशोक कदम , निलेश कुलकर्णी,नागनाथ वाढवणे,   यासह ग्रामसेवक , तलाठी शिक्षक, कृषी सहाय्यक , आरोग्य कर्मचारी , महसुल , पंचायत चे तालुक्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.मागण्याचे निवेदन तहसीलदार गजानन शिंदे यांना देण्यात आले हे ढोल बजाव आंदोलन सकाळी १०ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू होते.

मागणी मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहणार—टि.जी रातोळीकर 

राज्यातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना सरकारने सुरू करावी म्हणून गेल्या चार दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.पण सरकारने अद्याप कुठलेच पाऊल उचलले नाही जो पर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील तसेच पुढील काळात तीव्र आंदोलन होतील यांची सरकारने दखल घेऊन तात्कळ निर्णय घ्यावा अशी प्रतिकीया ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष टि.जी.पाटील रातोळीकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.