नायगांव तहसील कार्यालय अंतर्गत एपीएल राशन धारकांचे अनुदान बॅकेत जमा –ए.एस दराडे 

759

 

 

नायगांव विषेश प्रतिनिधी – लक्ष्मण बरगे

शासनाच्या वतीने एपीएल योजना अंतर्गत येणा-या शेतक-यांना दर महा धान्या ऐवजी प्रति व्यक्ति १५० रूपये प्रमाणे तालुक्यातील १६ गावातील ७७ एपीएल धारक शेतक-यांचे आधार लिंक असलेल्या बॅक खात्यात तीन महीण्याचे ६ लाख ९१हजार अनुदान नायगाव तहसिल कडून जमा करण्यात आले असुन येत्या चार दिवसात जमा केलेले अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात जमा होईल अंशी माहिती पुरवठा विभागाच्या अव्वल कारकुन श्रीमती ए ,एस , दराडे यांनी दिली,

 

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षा पासुन शेतक-यांना ही धान्य वितरित करण्यात येत होते कोरोणा काळात महीण्यात दोन वेळा धान्य देण्यात आले त्यानंतर सरकारने शेतक-यांना धान्य देण्याचे बंद करून त्यांच्या खात्यात थेट रक्कम टाकण्याचे आदेश दिले होते या आदेशाचे पालन करत स्वस्त धान्य दुकानदाराकडून एपीएल कार्ड धारकाचे फार्म भरूण कागद पत्रे जमा करून तहसिल मध्ये दाखल करण्यात आले यात तालुक्यातुन २२०० कुटूबाचे फार्म दाखल झाले होते  .

यामधून इज्जतगाव , रूई खु , सातेगाव , ईकळीमाळ , सांगवी , धनज , डोंगरगांव , बेद्री , गोळेगाव , कुंचेली , माजंरम , गडगा , अशा सोळा गावातील ७७ कुटूंबातील ५४२ लाभार्थ्याचे कागदपत्रे बरोबर आल्याने त्यांच्या खात्यात जानेवारी ते मार्च अशा तीन महीण्याचे ६ लाख ९१ हजार बॅकेत जमा करण्यात आले असुन अनेक शेतक-यांनी फार्म फरून दिले पण त्यात मोठ्या प्रमाणात तुर्टी असल्याने त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यासाठी अडचणी येत असल्याचे महसुल विभागाकडून सागंण्यात आले आहे            

 

विशेष म्हणजे ज्या लाभार्थ्यानी एसबीआय व महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे खाते नंबर दिले आहे त्यांचेच अनुदान जमा झाले आहे तर दुस-या बॅकेचे ज्यांनी खाते नंबर दिले असेल त्यांनी त्वरित एसबीआय किवा महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे खाते नंबर संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे द्यावे असे आवाहन पुरवठा विभागाच्या कारकुन श्रीमती ए एस दराडे ,गोडाउन किपर शेख युनुस भाई , नामदेव शिवनकर यांनी केले आहे .

 

अंतोदय लाभार्थ्यांना दोन महीण्याची साखर मिळालीच नाही .

अंतोदय कार्ड धारकांना गहू तांदूळ मिळत आहे पण गेल्या दोन महीण्यापासुन साखर मिळाली नाही तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन अंतोदय लाभार्थ्यांना साखर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी कार्ड धारकातुन होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.