कोकलेगाव ते शेळगाव रोडवर ट्रक व ट्रॅक्टरचा भीषण अपघात अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी.

814

 

नायगाव प्रतिनिधी – अशोक वाघमारे 

 

नायगाव तालुक्यातील कोकलेगाव ते  छत्री शेळगाव  रोडवर भीषण अपघात झाला असून चणाडाळ घेऊन जाणारा ट्रक व ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक झाली, यात ट्रॅक्टर ड्रायव्हरला मोठी दुखापत झाली आहे. आणि तो गंभीर जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

- Advertisement -

सदर घटना दिनांक 26/2/2024 सायंकाळी आठच्या दरम्यान घडली आहे. अशी माहिती स्थानिक नागरिकाकडून मिळाली आहे. नागरिकांच्या सांगण्यावरून ट्रक हा अहमदनगर जिल्ह्याचा असून त्यांचा ड्रायव्हर हा कोकले गाव जवळील राजगड नगर येथील झगडे असे नाव आहे. झगडे हा अतिवेगात ट्रक चालवत होतात त्या ट्रक चा नंबर एम एच 16 बीसी 35 35 असून त्या ट्रक मध्ये अंदाजित 16 क्विंटल च्या आसपास चणाडाळ असल्याचे सांगण्यात आले आहे तर हा अपघात होताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे . 

ट्रक मधील चना डाळीवर मात्र स्थानिक नागरिकांनी डल्ला मारल्याचे सांगण्यात आले आहे आणि सदर घटनेत  ट्रॅक्टर ड्रायव्हर हा गंभीर जखमी झाला  आहे

सदरील अपघातात ट्रॅक्टरचा मोठर टायर तुटून देखील बाजूला पडल्याचे दिसून येत आहे या ट्रॅक्टरचा नंबर एम एच 26 बी ओ 68 23 असून यात ट्रॅक्टर व ट्रक यांचिर समोर समोर धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर सदर घटनेत दोन्ही वाहन रस्त्याच्या बाजूला पडल्याचे दृश्य दिसून येत आहेत. आणि यात दोन्ही वाहनांच मोठं नुकसान झाल्याचे देखील दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.