हदगाव येथील तरुणांची नायगाव तालुक्यातील देगाव जवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या.
नायगाव तालुका प्रतिनिधी :- रामप्रसाद चन्नावार
नायगाव तालुक्यातील कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मौजे देगाव येथील गावा लगत जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला तुकाराम मोरे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळ्यातील दस्तीने गळफास घेऊन तरुण युवकांनी आत्महत्या केली आहे.
सदरील घटना 26 आॅक्टोबर च्या रात्री घडली असून 27 आॅक्टोबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली. घटना समजताच कुंटूर पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्या केलेला युवक विक्रम प्रकाश रावुलवार वय वर्षे 25 व्यवसाय मजुरी रा. वडगाव ता हदगाव येथील आहे.
पोलिसांनी सांगितलेल्या माहिती नुसार सदरील तरुण हा देगाव येथील बहिणीच्या घरी आला होता. तो नेहमी दारुच्या नशेत राहत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मयत तरुणाचे लग्न झालेले नव्हते. तो काही दिवसापासून नायगाव येथे हाँटेलमध्ये राहुन काम करत होता अन दारु पिऊन मिळेल ते काम करत होता असा त्याचा स्वभाव असल्याची माहिती फिर्यादी मयताचे वडील प्रकाश किशन रावुलवार यांनी कुंटुर पोलीस ठाण्यात येऊन दिली आहे.
कुंटुर पोलिसांनी मृत व्यक्तीचे शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.