कृष्णर एम.आय.डि.सी. येथील कीर्ती गोल्ड कंपनीकडून व्यापाऱ्यांची लूट. व्यापाऱ्यात संताप उच्चस्तरीय चौकशीची मागणी.
नायगाव तालुका प्रतिनिधी – रामप्रसाद चन्नावार
नायगाव तालुक्यातील कृष्णुर औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रसिद्ध कीर्ती गोल्ड दाल मिल अँड प्रोडक्शन कंपनी सदैव या ना त्या कारणाने वादाच्या भवऱ्यात सापडत असते परंतु शासन व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षा मुळे शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची कीर्ती गोल्ड कंपनीकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्यामुळे व्यापाऱ्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील पंचतारांकित कृष्णुर औद्योगिक वसाहतीमध्ये ( एम.आय.डि.सी.) असलेल्या कीर्ती दाल मिल अँड फ्रुट्स प्रोडक्शनच्या वतिने व्यापाऱ्याकडून सोयाबीनच्या मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते कंपनीकडे विक्रीसाठी नायगाव येथील आडत व्यापाऱ्यांच्या सोयाबीनच्या वजन काटामध्ये एका ट्रकच्या मागे दोन ते अडीच क्विंटल वजन कमी दाखवल्याने दोन ते अडीच क्विंटलची चोरी होत असल्यामुळे व्यापाऱ्यांचा एका गाडीमध्ये नऊ ते दहा हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत कंपनीच्या मॅनेजरला धारेवर धरले , लातूर येथील प्रसिद्ध व्यापारी कीर्ती गोल्डच्या मालकीची लातूर, सोलापूर, नांदेड जिल्ह्यातील कृष्णुर, हिंगोली, फूड प्रॉडक्शनच्या नावाखाली दाल मिल व ऑइल मिल चालू केले परंतु कृष्णुर एमआय डी सी मध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये कीर्ती दालमिल व प्रोडक्शन फूड प्रोडक्शन असे असताना या ठिकाणी अद्याप दालमिल अस्तित्वातच नाही परंतु शासनाची फसवणूक होत असून याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे
कीर्ती गोल्डच्या अशुद्ध पाण्यामुळे बऱ्याच प्रमाणात पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांची जनावरे दगावली होती तर मजुरांच्या पायावर दुर्घटना घडली होती , कीर्ती कडून मालक व ट्रक चालक यांच्या मध्ये वाद निर्माण झाला होता त्यामुळे एकमेकावर गुन्हे दाखल झाले होते, बऱ्याच वेळेस कंपनीची चौकशी विविध अधिकाऱ्याकडून करण्यात आली होती, तसेच विविध संघटनाच्या वतीने उपोषणही करण्यात आले, काही संघटनाने कीर्ती गोल्ड कंपनीची जीएसटी आयकर ,सी आय डी, इ डी ,मार्फत चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल असे शेतकरी व्यापारी विविध संघटनाच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे व्यापाऱ्यांच्या सोयाबीनमध्ये मातीचे माऊचर जादा काढणे ,वजन काट्यात खोटं करून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्यामुळे व किराणा व्यापाऱ्यांसोबत तेलाचा व्यवहार करीत असताना जीएसटी वाचवण्यासाठी बऱ्याच प्रमाणात कच्या पावत्या देणे, पैशाचा नगदी व्यवहार करणे,प्रत्येक तेलाच्या टाकीमध्ये तेल कमी देणे,असे व्यापाऱ्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.किर्ती गोल्ड कडुन वारंवार होत असलेला प्रकार उरमट वागणुक उद्धट भाषा अश्या अनेक समस्यांनी उच्चांक. गाठला असून या सर्व गोष्टी कडे शासन लक्ष देईल का ? असा सवाल व्यापारी व जनतेतून बोलल्या जात आहे.