पी एम किसान सन्मान योजने पासुन नायगाव तालुक्यातील हजारो शेतकरी वंचीत.

तहसीलदार यांनी लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी.

291

नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क.

केंद्रशासन व राज्य शासन बहुचर्चित असलेल्या किसान सन्मान योजना अंतर्गत प्रति शेतकरी लाभार्थी वार्षिक   सहा हजार रुपये अगोदर केंद्र  शासनाकडून शेतकऱ्यांना मिळत होते, परंतु  राज्य सरकारने यात अजून सहा हजाराची भर टाकून आता ही रक्कम प्रती लाभार्थी शेतकरी जे या योजनेत पात्र आहेत त्यांना प्रती वर्षी बारा हजार रूपये देणार आहेत..

परंतु मागील काही दिवसापासून संबंधित रक्कम मिळन्यास अडचण निर्माण होत आहे.

- Advertisement -

याचे कारण की काही शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नसल्यामुळे रक्कम मिळत नाही तर काही शेतकऱ्यांच्या संबंधित वेबसाईटवर शेतीचे रेकॉर्ड दाखवत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची रक्कम मिळण्यास अडचण निर्माण होत आहे, परिणामी शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयास चकरा मारून परेशानं  होत आहेत.

तहसील प्रशासनाने संबंधित योजनेच्या अंमलबजावणीसाठी तहसील कर्मचारी नांदेडकर  यांची नियुक्ती केली आहे परंतु त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली निघत नाहीत व ते व्यवस्थित मार्गदर्शन करत नाहीत अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

नवनिर्वाचित तहसीलदार यांनी संबंधित प्रकरणी लक्ष घालून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा व शेतकऱ्यांची परेशानी दूर करावी अशी सर्वसामान्य शेतकरी लाभार्थी अशा व्यक्त करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.