नायगांव तालुका डिजिटल मीडिया परिषद कार्यकारणी जाहीर -तालुका अध्यक्षपदी गंगाधर गंगासागरे कार्याध्यक्ष गजानन चौधरी तर सचिव पदी शेषराव बेलकर पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर.

676

नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क

नायगाव तालुका डिजिटल मीडिया परिषद कार्यकारिणीची निवड आज नांदेड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडले असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाअध्यक्ष गोवर्धन बियाणी , डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिंदे , डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष संघरत्न पवार , जिल्हा उपाध्यक्ष तानाजी शेळगावकर यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज निवड संपन्न झाली.

तालुक्याचे जेष्ठ पत्रकार गंगाधर गंगासागरे तालुका अध्यक्षपदी व कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार गजानन चौधरी तर सचिव पदी शेषराव बेलकर पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे .

- Advertisement -


उर्वरित कार्यकारिणी तालुका उपाध्यक्ष हनुमंत चंदनकर , कोषाध्यक्ष मिलिंद बच्छाव सदस्य शिवाजी पांचाळ , सदाशिव अंदेलवाल आदींची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.