पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त  विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

शेळगाव गौरी हे जिल्ह्यासाठीच नाही तर उभ्या महाराष्ट्रासाठी ते एक आदर्श गाव आहे शेळगाव गौरीचा आदर्श इतर गावांनी घ्यावा- सौ .प्रणिता ताई देवरे चिखलीकर 

218

 

 

 

तानाजी शेळगावकर

शेळगाव गौरी हे गाव नांदेड जिल्ह्यासाठीच नाही तर उभ्या महाराष्ट्रासाठी एक आदर्श गाव असल्याची ओळख असुन या गावचा आदर्श इतर गावांतील प्रमुखांनी घ्यावा आणि स्वच्छा गाव सुंदर गावांचा शिखर वरचेवर कशा पद्धतीने वाढविता येईल यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न करावेत असे गौरव पर उदगार मा.जिल्हा परीषद सदस्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी काढल्या.

- Advertisement -

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार व गुणवंत विद्यार्थीचा सन्मान सोहळा आणि शिवस्वराज्य दिन अशा त्रिसंगमीय कार्यक्रमाचे आयोजन शेळगाव गौरी ग्रामपंचायत कार्यालयात दि.५ जुन रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी उद्घाटक म्हणून बोलत होत्या.

या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून संस्कृतीक संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेचे चेअरमन प्रमोद केशवराव देशमुख हे होते तर उद्घाटक म्हणून मा.जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. प्रणिताताई (देवरे) चिखलीकर होत्या.

यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी एल .आर.वांजे, सपोनि संकेत दिघे, तलाठी विजय पा. जाधव, ग्रामविकास अधिकारी धनंजय केत्ते, आदर्श गावांचे सरपंच प्राचार्य मनोहर जळबा तोटरे सर,सामाजिक कार्यकर्ते माधवराव कंधारे, विस्तार अधिकारी महेश मुखेडकर,बाबु डोके,इरवंत सुर्यकर, पत्रकार सुनिल रामदासी.पत्रकार.शेषराव कंधारे पत्रकार तानाजी शेळगावकर यांसह आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमांची प्रस्तावना करताना शेळगाव गौरी ग्रामपंचायतचे सरपंच प्राचार्य.मनोहर तोटरे सर म्हणाले की विविध क्षेत्रातील महिलांचा व दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सन्मान झाला पाहिजे ह्या उधात हेतुने हा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आला असल्याचे सांगितले.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार सौ.सुमित्राबाई अशोक पाटील, सौ. लताबाई विनायक पाटील ,डॉ.सौ.आशा तानाजी वाघमारे,सौ. शांताबाई विठ्ठल गंगासागरे, सौ. दैवशाला बळीराम वाघमारे,शालाबाई बालाजी पाटील,सौ. सोन्याबाई ईबीतदार,सौ.प्रणिता आनंद रामदासी,सौ. शाईनाजबी जलीलसाब सय्यद,सौ. सुजाता मारोती वाघमारे यांच्या कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह,प्रशस्तीपत्र,शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तर दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या बारा विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह,प्रशस्तीपत्र,शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

अध्यक्षीय समारोप करताना प्रमोद देशमुख म्हणाले की माणवी जीवन अधिक कसे सक्षम होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे

स्वच्छ गाव सुंदर गाव शेळगाव गौरी गावांचा अधिक अधिक शिखर वाढविण्यासाठी जो आज ग्रामपंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार व गुणवंत विद्यार्थीचा सन्मान सोहळा आणि शिवस्वराज्य दिन अशा त्रिसंगमीय या आगळ्यावेगळ्या उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सुरेख सुत्रसंचलन प्रा. पुंडलिक काठेवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन नागनाथ वाढवणे सर यांनी मानले.यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, सदस्य,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.