शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जनतेने सहभाग घ्यावा – ज्ञानेश्वर बेलकर
नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क –
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत कसा मिळाला पाहिजे यासाठी दिनांक 25 जून रोजी नांदेड शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यातील 75 हजार लोकांना या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन असून या कार्यक्रमात जनतेने सहभाग नोंदवावा असे आवाहन शिवसेना नायगाव तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पाटील बेलकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राबवित असलेल्या अनेक योजना सर्वसामान्य लोकापर्यंत मिळाल्या पाहिजे या उद्देशाने शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम असून शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे नम्र आवाहन शिवसेना नायगाव तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पाटील बेलकर यांनी केले आहे.
शिवसेना या पक्षामध्ये काही महिन्यापूर्वीच पक्षप्रवेश केलेले ज्ञानेश्वर पाटील बेलकर हे अतिशय वेगाने पक्ष वाढविण्यासाठी जोमाने काम करतात त्याबद्दल त्यांचे नायगाव तालुक्यामधून विविध समाज बांधवाकडून कौतुक होत असताना त्यांच्या कार्यास अनेकांनी अभिनंदन केले आहे. तर त्यांच्या आव्हानास स्वीकारून शासन आपल्या दारी या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हावे.