विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन सदैव बदलणारा कलात्मक शिक्षक म्हणजे ..महादवाड बाबाराव रामजी…

325

 

तानाजी शेळगावकर

मानवी जीवनात विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुरुवात करण्याचे क्षण येतात. लहानपणी अन्नाचा घास भरवायचा म्हणजे दुधापासून फारकत घ्यायची सुरुवात.पुढे बालवाडीत जाण्याची सुरुवात त्यानंतर शाळेत.कॉलेजात.संसारात नोकरी,व्यवसायात आणि शेवटी सेवा निवृत्तीची सुरुवात..आज अश्याच एका विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन सदैव बदलणारा कलात्मक शिक्षक म्हणजे..महादवाड बाबाराव रामजी यांच्या निवृत्त सेवे निमित्त पत्रकार तथा त्याचा विद्यार्थी म्हणून घेतलेला हा छोटासा लेख….

- Advertisement -

श्री महादवाड बाबाराव रामजी याचा जन्म 23 मार्च 1965 रोजी मौ,खंडगाव (बेंन्द्री) ता.नायगांव जि.नांदेड येथे झाला.प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडगाव तर माध्यमिक शिक्षण जनता हायस्कुल नायगांव येते झाले.लहाणपणा पासूनच शिक्षणाची खुप आवड होती तसे कुटुंबातील मोठे बंधु किशनराव रामजी महादवाड आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आसल्यामुंळे त्याच्या मार्गदर्शनाने हि शिक्षण प्रक्रिया पुर्ण झाली.

महादवाड बाबाराव रामजी – मुख्याध्यापक (ma. Bet) कै. रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालय, शेळगाव( गौरी ) ता नायंगाव जि.नांदेड येथुन सेवानिवृत्त होत आहेत त्याच्या परिवारातील आर्धागीणी – सौ. जानकी बाबाराव महादवाड. मुलगा दिपक बाबाराव महादवाड सुनबाई सौ.योगिता दिपक महादवाड मुलगी सौ. दिपाली गोविंदराव अमृतवाड जावई याचेही महत्त्वपुर्ण सहकार्य मिळाले आहे.

संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, धुप्पा-शंकरनगर ता. नायगाव वर्ष 1984 पासून 1998- 14 वर्ष कला शिक्षक’ तर 1998 पासून 2016 – 18 वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून शिक्षणाचे अविरत कार्य केले नायगांव तालुक्यातील नामवंत शाळा म्हणून आनेक विद्यार्थी घडविले.तर धुप्पा.2016 पासून 2022 – 6 वर्षे पर्यवेक्षक व .2022 पासून 2023- मुख्याध्यापक, 4 महीने
शेळगाव (गौरी) येथील कै,रामचंद्र पाटील मा.विद्यालय येथुनच सेवानिवृत्त होत आहेत.

महादवाड बाबाराव रामजी याचे शिक्षणा बरोबरच सामाजिक अभियानात सुद्धा महत्त्वाचे योगदान राहिले आहे
– 1992-93 – साक्षरता अभियानात सक्रिय सहभाग- तर 05 सोहबर 2005 मध्ये तालुका स्तर ‘गुरुगौरव पुरस्कार प्राप्त झाला.केंद्र सरकार तर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘निर्मल ग्राम पुरस्कार” राज्य स्तरीय तपासणी मध्ये निवड – “सुरक्षीत अभियान” मध्ये नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यात साधक व्यक्ती काम केले.संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभिमान,शेळगाव (गौरी) हे गांव महाराष्ट्रात द्वितीय तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक घेतला त्या ठिकाणी सरानी विविध आकर्षक चित्र व समाजप्रबोधन म्हणी गावातील प्रत्येक भिंत व रिकामी जागी रंगवलेली पाहिली,‘मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण” मध्ये साधन व्यक्त म्हणून काम केलेले आहे,
ज्ञान संवर्धन शिक्षण मंडळ धुप्पा परिवाराचे अध्यक्ष.सचिव व सर्व शिक्षक यांचे सुद्धा महत्त्वाचे योगदान मिळाले आहे.शिक्षण क्षेत्रातील आनेकानी शुभेच्छाही दिल्या आहेत.प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे सर.अशोक तात्या बावणे सर.राजेन्द्रं पाटील शेळगांवकर सर.नागनाथ वाढवणे सर यानी शुभेच्छा दिल्या आहेत.

थकलेल्या माणसाला पाणी पाजून पुढच्या प्रवासासाठी धीर देत “काही नाही आता जवळ आले आहे फक्त अर्ध्या तासात पोहोचू” आसा शब्द देताना पाहातो पण नव्या जीवनाची सुरुवात करताना विद्यार्थी जिवन फार महत्त्वाचा टप्पा आहे महादवाड बाबाराव रामजी सर हे चित्रकला.गणित.योगासने.मानवी मनोरे शिकवणारे शिक्षक त्यांचा स्वभाव शांत व सयंमी शिक्षणाची शिकवण्याची अचुक पद्धत हि खुपच वेगळी मि सराचा 1993 ते 1998 पर्यतचा विद्यार्थी म्हणजे 8 वी ते 12 पर्यतचा माझ्या सारख्या आनेक विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन सदैव बदलणारा कलात्मक शिक्षक म्हणजे..महादवाड बाबाराव रामजी सर हे आज आदर्श शिक्षक म्हणून सेवानिवृत्त होत आहेत त्यांचे पुढील आयुष्य निरोगी व आरोग्यदायी व्हावे हिच मनःपूर्वक खुप-खुप सदिच्छा…..

Leave A Reply

Your email address will not be published.