राहेर येथील माती साठा प्रकरणी तहसीलदार यांची चोर सोडून सन्याशाला फाशी..रीतसर परवानगी घेऊन सुधा सातबाऱ्यावर बोजा टाकला. सदरील प्रकरणी 1मे पासून तहसील कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण.

मंडळ अधिकाऱ्याच्या अहवालाला दाखवली केराची टोपली.

279

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क 

नायगाव : तालुक्यातील राहेर येथील गट क्रमांक ४६७ मधून परवानगी घेवून २०० ब्रास मातीचे उत्खनन करण्यात आले पण गट क्रमांक २२० मध्ये अवैध साठा केला म्हणून १ लाख ६५ हजाराचा बोजा टाकण्यात आला. नियमबाह्य टकण्यात आलेला बोजा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शेषराव बेलकर यांनी १ मे महाराष्ट्र दिनापासून तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

नायगाव तालुक्यातील राहेर येथील गट क्रमांक ४६७ मधून २०० ब्रास मातीचे उत्खनन करण्यासाठी संजीत दादाराव जाधव व कुंभार समाजातील व्यक्ती मलिकार्जुन माधव कुंभार यांनी रितसर परवानगी घेतली. परवानगी २०० ब्रासची असताना ६५ ब्रासच उत्खनन केले व वैध उत्खनन केलेल्या मातीचा साठा गट क्रमांक २२० मध्ये केला. महसूल विभागाने आक्टोबर २०२२ मध्ये एक नोटीस देण्यात आली होती. त्यावेळी सदरच्या नोटीसीला उत्तर देताना गट क्रमांक २२० च्या शेतमालकाने सदरच्या मातीचे उत्खनन हे कायदेशीर करण्यात आले असून. ६५ ब्रास माती उत्खनन केल्याच्या पावत्या सोबत जोडून रितसर खुलासाही सादर केला होता.

- Advertisement -

परवानगीच्या पावत्या जोडून सादर केलेल्या खुलाशाला कचरा कुंडी दाखवून तहसीलदार गजानन शिंदे यांनी गट क्रमांक २२० वर ६५ ब्रास मातीचा अवैध साठा केल्या प्रकरणी १ लाख ६५ हजाराचा बोजा टाकला.

त्यामुळे शेषराव बेलकर यांनी सदर प्रकरणी तहसीलदार गजानन शिंदे यांची भेट घेवून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली व नियमबाह्य टाकलेला बोजा रद करण्याची मागणी केली पण या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने बेलकर यांनी उपोषणाचा मार्ग स्विकारला असून ( ता. १) मे पासून तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

 

महसूल विभागाची बेबंदशाही…

नायगाव तहसील कार्यालयाच्या लाचखोर धोरणामुळे गोदावरी नदीपात्राचे वाळवंट होत असून. दररोज शेकडो ब्रास मातीचे अवैध उत्खनन होत आहे. होणारे हे अवैध उत्खनन थांबवण्याऐवजी रितसर परवानगी घेवून उत्खनन करणाऱ्यांचा अर्थिक छळ करण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.