नायगांव महावितरण कंपनीच्या इमारत मालमत्ता कर व भाडे थकबाकी झाल्याने अखेर नगरपंचायतीने महावितरण कार्यालयास ठोकले टाळे.

वेळोवेळी नोटीस देऊनही कर न भरल्याने नगरपंचायतीने केली कार्यवाही.

533

 

नायगाव / प्रतिनिधी    रामप्रसाद चन्नावार 

नायगाव येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाची इमारत नगरपंचायतीच्या मालकीचे इमारतीमध्ये असल्यामुळे नगरपंचायतीचे मालमत्ता कर व इमारत भाडे थकबाकी झाल्याने अखेर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या आदेशाने कर्मचाऱ्यांनी टाळे ठोकले.

- Advertisement -

शहरातील महावितरण कंपनीचे तालुक्याचे उपविभागीय कार्यालय मालकीच्या जागेत असून पाच वर्षापासून मालमत्ता कर व इमारत भाडे एकूण दहा लाख नव्वद हजार दोनशे शहात्तर रुपये 1090276 — थकबाकी झाल्याने महाविज वितरण कंपनीला वेळोवेळी नगरपंचायतीच्या वतीने 2021 ते 2022 मध्ये नोटीसा देऊनही महावीजवितरण कंपनीने भाडे कर न भरल्याने अखेर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी यांच्या आदेशाने टाळे ठोकले आहे.

कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव कर्मचारी रामेश्वर बापुले श्रीधर कोलमवार मुन्ना मंगरुळे. संभाजी भालेराव. रमेश चव्हाण .गणेश चव्हाण. गोपाळ नाईक.बालाजी बोईनवाड. श्रीराम बेळगे. धनराज वरणे .शेख मौला.उमेश कांबळे.प्रविण भालेराव.साईनाथ बेळगे. या सर्व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी टाळे ठोकल्याने एकच खळबळ उडाली असून यानंतर तहसील कार्यालयाजवळ असलेल्या 33 केव्ही कार्यालयाचे थकबाकी शिल्लक असल्यामुळे वेळोवेळी नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे नगरपंचायतीच्या वतीने 33 केवी कार्यालयाला अखेर सोमवारी टाळे ठोकण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.