तुळजाभवानी जिनिग प्रेसिंग सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या श्रावण पाटील भिलवंडे यांच्या गटाचे तेरा उमेदवार तर भास्करराव पाटील खतगावकर गटाचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी.
नायगांव / प्रतिनिधी रामप्रसाद चन्नावार
नरसी येथील तुळजाभवानी जिनिंग प्रेसिंग संस्थेची निवडणूक भिलवंडे व खतगावकर गटाने अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. यामध्ये निवडणूक होऊ नये म्हणून खतगावकर गटाने न्यायालयाचे दरवाजे पण ठोठावले होते .या प्रक्रियेत श्रावण पाटील गटाने बाजी मारत अखेर निवडणूक प्रक्रिया घेण्यास प्रशासनास भाग पाडले.
आज दिनांक 21 रोजी नरसी येथील जिनिंग परिसरात निवडणुकीची प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये श्रावण पाटील गटाने जोरदार तयारी केली होती व सभासद संख्या जमवण्यात यशस्वी झाल्याचे चित्र दिसत होते. (अ) वैयक्तिक मतदार संघ १२ जागा.आणि (ब) संस्था मतदार संघ ३ जागा अशा ऐकून १५ जागेवर निवडणूक घेण्यात आली.
या मधील वैयक्तिक मतदार संघात बारा जागेसाठी बारा अर्ज श्रावण पाटील गटाचे शिल्लक राहिल्यामुळे बाराही जण बिनविरोध निवडून आले तर संस्था मतदारसंघातून तीन जागेपैकी दोन जागेवर खतगावकर गटांचे तर एक जागेवर श्रावण पाटील गटांचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
या सर्व निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पार्टीचे नेते श्रावण पाटील यांचे नेतृत्वाखाली सदरील निवडणूक चुरशीची होऊन अखेर भाजपाने निर्विवाद नरसी च्या जिनिंग व प्रेसिंग संस्थेवर वर्चस्व सिद्ध केले तर खतगावकर गटास केवळ दोन जागेवर समाधान मानावे लागले. सदरील निवडणूकीत यश मिळवल्या बद्दल श्रावण पाटील यांचे राजकिय क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.