जि.प.प्रा.शा.हिप्परगा (जा) ता.नायगाव खै.मोफत दंत तपासणी शिबिर संपन्न.
नायगाव / प्रतिनिधी रामप्रसाद चन्नावार
जि.प.प्रा.शा.हिप्परगा जा. येथील विद्यार्थ्यांचे दात पिवळे, वाकडे,किडके दिसत होते म्हणून येथील मुख्याध्यापक श्री माधव वटपलवाड व शिक्षकांनी श्रीकृष्ण डेंटल केअरचे संचालक डॉ किरण नागधरे व डॉ.सौ. स्वाती नागधरे यांना विनंती केल्यामुळे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून दिं.16 मार्च 2024 रोजी शाळेमध्ये येवून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची, पालकांची व गावातील मंडळींची मोफत तपासणी व मार्गदर्शन केले. बोअरमधील क्षारयुक्त पाण्यामुळे असा परिणाम दिसून येतो शुध्द पाणी पिण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच दाताची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या वतीने दोन्ही डाॅ. दांपत्याचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेतला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शा.व्य.स.चे अध्यक्ष श्री रामदास पाटील कदम होते तर प्रमुख अतिथी म्हणून हिप्परगा येथील सरपंच श्री प्रदीप गारोळे, गावातील जेष्ठ नागरिक श्री एकनाथ पाटील,शा.व्य.स.चे उपाध्यक्ष श्री परसराम पाटील कदम तसेच सदस्य श्री आनंदराव गारोळे श्री दत्ता पाटील कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री माधव वटपलवाड यांनी केले, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री यलपलवाड सर, श्री यमलवाड सर, श्री म्याकलोड सर, श्री गायकवाड सर, श्री पचलिंग सर व सौ.शिंगडे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
