मांजरम येथे  51   रक्तदात्यांनी रक्तदान करुन छत्रपती शिवाजी महाराजांना केले अभिवादन…

शिवजयंती निमित्त मांजरम येथील शिवप्रेमींचां अनोखा उपक्रम...

383

नरसीफाटा / शेषेराव कंधारे

नायगाव तालुक्यातील मांजरम येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करुन जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नायगाव तालुक्यातील मांजरम येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर महारक्तदान शिबिराचे व शिव स्मारकाचे उद्घाटन श्री.गुरु यदुबन महाराजांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऐकावन रक्तदात्यांनी रक्तदान करुन महाराजांना अभिवादन केले.

- Advertisement -

तर दुस-या सत्रात छत्रपती शिवाजी राजांची तेल चित्रांचे मिरवणूक ट्रॅक्टर, जेसीबी रॅली,भगवा ध्वज पथकासह ढोल ताशा सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन गावातील मेन चौकातुन पालखी मिरवणुक मार्गस्थ झाली संपूर्ण गावातील माता-भगिनी लहान थोरांनी पालखीतील छत्रपती चे पूजन करुन दर्शन घेतले. शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होण्याकरिता शिवजन्मोत्सव समितीचे सर्वच सदस्यांनी व गावातील नागरिकांनी मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.