नायगाव तालुक्यात बारावी बोर्डाच्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरण सुरू.

परिक्षार्थी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प चॉकलेट देऊन दिल्या शुभेच्छा.

761

 

नायगाव/शेषेराव कंधारे

मा.जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्य कॉपीमुक्ती झाला पाहिजे यासाठी काॅफिमुक्त पॅटर्न राबवुन यशस्वी करून दाखविले पालक व विद्यार्थी सुद्धा त्यांना कॉपी मुक्तीसाठी प्रतिसाद दिला आहे.

- Advertisement -

त्यांचाच निर्णय आजही प्रशासनाकडून राबविण्यात येत असून नायगाव तालुक्यातील सात परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षा दि.२१ फेब्रुवारी रोजी पाहिला इंग्रजी पेपरला सुरुवात झाली असून सर्वच परीक्षा केंद्रावर सुरळीत चालू असल्याचे दिसून आले.परिक्षार्थी विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन  शुभेच्छा दिल्या..

नायगाव तालुक्यातील जनता कनिष्ठ महाविद्यालय
नायगांव येथे पात्र विध्यार्थी ७८६ गैरहजर १६ उपस्थित ७७० ,दत्त कमवि, नायगाव पात्र विध्यार्थी ३७३ गैरहजर ०२ उपस्थित ३७१,यमुनाबाई कमवि, नायगाव पात्र विध्यार्थी ४४९ गैरहजर १९ उपस्थित ४३०,साईबाबा कमवि, शंकरनगर पात्र विध्यार्थी ५०२ गैरहजर ०७ उपस्थित ४९५,पो. बे. आ. शा., मरवाळी तांडा पात्र विध्यार्थी ५४२ गैरहजर १९ उपस्थित ५२३,जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा पात्र विध्यार्थी ६४४ गैरहजर १५ उपस्थित ६२९,वि. ज. भ. जा., कुंटूर तांडा पात्र विध्यार्थी ५९४ गैरहजर १९ उपस्थित ५७५ असे एकुण सात परीक्षा केंद्रात ३७९३ विद्यार्थ्यांनी परीक्षेस पात्र असुन बारावीच्या सुरू असलेल्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपरला ९८ विध्यार्थी गैरहजर होते तर ३६९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिले असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगिले असून सातही परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या पहिल्या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शाळेतील शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या असून परीक्षा खेळीमेळीच्या वातावरणात व शांततेत पहिला पेपर विद्यार्थ्यांनी दिला आहे..


गटशिक्षणाधिकारी नंदकुमार काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षा केंद्र प्रमुख म्हणून एम.एन रिनगुटवार हे काम पाहत असून येथील परीक्षा केंद्रांवर नेमण्यात आलेल्या बैठे पथकात महसूल पथक, गटशिक्षणाधिकारी,गट विकास अधिकारी व फिरते पथक अशा चार पथकाच्या माध्यमातून इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरला काम पाहिले. तर या परिसरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी नायगाव ,रामतीर्थ व कुंटुर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.