टेंभूर्णी येथे महादेव मंदीर कलशारोहण ,अखंड शिवनाम सप्ताह, शिवमहापुराण कथा व परमरहस्य पारायण सोहळा .

274

 

नायगाव/ शेषेराव कंधारे 

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी टेंभूर्णी ता. नायगांव येथे प.पू.राष्ट्रसंत सद्गुरु ष.ब्र.१०८ डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर व प.पू.ष.ब्र.१०८ सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या प्रेरणेने व श्री.गुरुवर्य स्व.ओमप्रकाश स्वामी टेंभूर्णीकर यांच्या कृपा आशिर्वादाने अखंड शिवनाम सप्ताह दि.२१ ते २८ फेब्रुवारी पर्यंत आयोजित केला आहे. यात पहाटे ४ ते ६ शिवपाठ, ६ ते ८ रुद्राभिषेक, ८ ते ११ ग्रंथराज परमरहस्य सामुहीक पारायण, दुपारी १२ ते १गाथाभजन,दुपारी २ ते ५ शिवमहापुराण कथा, सायं. ५ ते ६ शिवपाठ, रात्री ९ ते ११ शिवकिर्तन नंतर शिवजागर होनार आहे. तरी परीसरातील भाविक भाविकांनी या दैनंदिन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन टेंभूर्णी येथील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

    दि.२१ फेब्रुवारी रोजी ९ ते ११ शि.भ.प. श्री.धनराज बुलबुले गुरुजी सामनगांवकर ,२२ फेब्रुवारी शि.भ.प.विवेकानंद स्वामी साकोळकर,२३ फेब्रुवारी शि.भ.प चंद्रकांत गुरुजीआमलापूरे गडगा,२४ फेब्रुवारी शि.भ.प.सौ.स्वातीताई माधवराव तंगशेट्टे दापकेकर,२५ फेब्रुवारी शि.भ.प निळकंठ विभुते लातूर,२६ फेब्रुवारी शि.भ.प सौ.भाग्यश्री विश्वजीत पाटील दवहहिपरगा,२७ फेब्रुवारी शि.भ.प विश्वनाथ स्वामी वडवळकर,दि.२८ फेब्रुवारी श्री.ष.ब्र.वेदांताचार्य दिगांबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांचे सकाळी ०९ ते ११ वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे.

दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता श्री.महादेव मंदिरांचा कलशारोहण वेदमंत्रोच्यारात श्री. ष.ब्र.१०८ डॉ. सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, श्री ष.ब्र. १०८ डॉ. सद्गुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड,महंत १०८ यदुबन गुरु गंभीरबन महाराज मठ संस्थान कोलंबी, श्री प.पू.सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती व श्री ष.ब्र.१०८ वेदांताचार्य दिगांबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांच्या शुभहस्ते सोहळा होईल.

      दि.२८ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या धार्मिक कार्यक्रमाचा परिसरातील सर्व भाविकभक्तांनी शिवमहापूरान कथा, परमहंस पारायण,कीर्तन श्रवण व कलशारोहण सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी टेंभूर्णी ता.नायगाव यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.