हृदयविकाराने निधन झालेल्या आईच्या चितेला मुलीने दिला अग्नी.

289

 

नायगाव/शेषेराव कंधारे 

धुप्पा ता.नायगाव येथील अनुसयाबाई मरिबा हनमंते यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दि.१७ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी दि.१८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता धुप्पा येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आला यावेळी अनुसयाबाई हिच्या पश्चात मुलगा नसल्याने मुलांचे कर्तव्य तिच्या मुलीनी पुर्ण करण्यासाठी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी रचलेल्या चित्तेस मुलीने अग्नी देऊन कार्य पूर्ण केले.

- Advertisement -

  वंशाचा दिवा म्हणून मुलगा असावा यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न करत असताना मुलगीच जन्माला आली तर तिला अनेक प्रकारचे नाव ठेवून मुलीला मुलाप्रमाणे न सांभाळता तिला परक्याचं धन समजून वागवत असतात परंतु मुलगा हा एका कुटुंबाचा आधार असला तरी मुलगी ही दोन कुटुंबाचा आधार आहे हे सिद्ध करून दाखवले.

धुप्पा ता. नायगाव येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी आपल्याला भाऊ नाही म्हणून खचून न जाता विवाहित असलेल्या दोन्ही बहिणी एकत्र येऊन आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी रचलेल्या चित्तेस अग्नी देऊन मुलाचे कार्य पूर्ण केल्याने मुलगा एका घराचा आधार असला तरी मुलगी हे दोन्ही कुटुंबाचा आधार असू शकते हे दाखवून देण्याचे धाडस ग्रामीण भागातील मुलीने केले.

Leave A Reply

Your email address will not be published.