पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुंटुंबियाना ५० लाखांची मदत द्या , फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्या..

नायगाव मराठी पत्रकारसंघाचे तालुका प्रशासनाकडे निवेदन..

169

 

नायगांव  प्रतिनिधी – रामप्रसाद चन्नावार

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या बातमीचा राग मनात धरून आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांनी आपल्या स्वतःच्या चारचाकी वाहनाने पत्रकार वारीशे यांच्या दुचाकीला जोराची नियोजित धडक देऊन त्यांना आपल्या कारखाली चिडले.त्यामध्ये पत्रकार वारीशे यांचा मृत्यु झालेल्या कुंटुंबियास प्रशासनाकडून ५० लाखांची मदत करून त्यांच्या कुंटुबियातील एक व्यक्तीला शासकीय सेवेत समावेश करावा.तसेच आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून हा खटला फास्टट्रॅक न्यायालयीन कोर्टात चालून आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणीचे निवेदन नायगाव मराठी पत्रकरसंघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना देण्यात आले.

- Advertisement -

      याविषयी अधिक माहिती अशी की,रायगड जिल्ह्यातील राजापूर येथील जेष्ट पत्रकार शशिकांत वारीशे यांची कारखाली चिरडून हत्या करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी याहेतूने नायगाव मराठी पत्रकारसंघाच्या वतीने काळीफित लावून निषेध करून तालुका प्रशासन दरबारी तहसीलदार गजानन शिंदे यांना गुरुवारी ९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १ वाजता निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पेरकेवार,जिल्हा संघटक पंडित वाघमारे, तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, तालुका सरचिटणीस दिलीप वाघमारे, कोषाध्यक्ष प्रकाश हणमंते, सहसचिव रामप्रसाद चन्नावार, उपाध्यक्ष गंगाधर गंगासागरे,तानाजी शेळगांवकर सह अन्य पत्रकारांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.