तीन दिवसांच्या कार्यक्रमांनी रातोळी नगरी दुमदूमली…

281

 

 

नायगाव- तानाजी शेळगावकर

रातोळी येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री. रोकडेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त सात दिवस सप्ताह , किर्तन, नयनरम्य आतीषबाजी जंगी कुस्त्यांचा फड, मनोरंजनात्मक कार्यक्रम या कार्यक्रमाबरोबरच रातोळी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला लोककला व लावणी महोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

- Advertisement -

रातोळी येथे रोकडेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त समस्त गावकर्‍यांच्या नेतृत्वाखाली विविध समाजउपयोगी उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला जातो. यावर्षीही कला संस्कृतीची योग्य शिकवण देणार्‍या विविध कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दि. 7 फेब्रुवारी रोजी लोककला व लावणी महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. या स्पर्धेत अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. यात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.

यात नामांकीत कलाकार, बालकलाकार, टिकटॉकमधील लावणी सम्राट किरण कोरे, गिरी संच नायगाव, देवश्री दमकोंडवार, समृध्दी पोलशेटवार, विद्या येमचे, किरण मडके, स्वरांजली जोंधळे, वैष्णवी सुपारे, पुजा राठोड, सोनाली भेदेकर, रामकृष्ण जेठे, आरोही पाटील, खुशी स्वामी, हर्षु नागपुरकर, सोनाली नागपुरकर, शाम गायकवाड यासह नराशाम विद्यालय रातोळी, ईगल इंग्लीश स्कुल, जि प शाळा रातोळी- शेळगाव, लिटल इंग्लीश स्कुल, जि. प. संच मुखेड, नटराज ग्रुप आदी कलाकारांनी भाग घेवून महाराष्ट्रातील गोंधळी, लावणी, हिंदी व देशभक्तीपर गित जुगलबंदी आदी प्रकार विविध कलाकारानी आपल्यातील कलागुण सादर करून येथील रसीक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

 

या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणुन डॉ. सानवी जेठवानी मॅडम व राजेंद्र बैस सर यांनी काम पाहिले. सुत्रसंचलन हाणमंत पाटील यांनी केले. 

 

नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिध्द असलेल्या रातोळी येथील भक्तांचे श्रध्दास्थान व नवसाला पावणार्‍या श्री. रोकडेश्वर महाराज यात्रेनिमित्त तिन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच पारंपारीक लोककला व लावणी महोत्सव पाहण्यासाठी रातोळी नगरी दुमदुमली होती. यावेळी कला महोत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातील रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा कमीटी रातोळी व रातोळीकरांनी परिश्रम घेतले..

Leave A Reply

Your email address will not be published.