आईवडिलांच्या प्रति कृतज्ञता म्हणजे त्यांच्या पुण्यसमरणा चा सोहळा होय – ह.भ.प.सुनीता ताई आंधळे

स्व.बालाजीराव पा.रातोळीकर यांची पुण्यतिथी सामाजिक व धार्मिक उपक्रमांनी रातोळीत साजरी.

151

 

नांयगाव / प्रतिनिधी रामप्रसाद चन्नावार

आई वडिलांच्या सेवेचे फळ बहुमोल असून त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणजे पुण्यसमरण साजरे करणे होय त्याचा विसर न पडू देता आपण आपले पुण्यफलातील कार्य अविरत केले पाहिजे असं मत ह.भ.प.सुनीता ताई आंधळे यांनी स्व.बालाजी पा.रातोळीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात रातोळी ता नायगाव येथे व्यक्त केले.

- Advertisement -

त्या पुढे म्हणाल्या मानवी जीवनाचे सार्थक करून घ्यायचे असेल तर क्षणा क्षणाला इशवराचा विसर न पडू देता आपले जीवन कार्य करावे .राष्ट्र निष्ठा हीच ईशवर निष्ठा असून देश सेवे करिता बलिदान देणाऱ्या देशभक्तांनी क्षणो क्षणी विचार करून कार्य केले म्हणूनच आपली भारतमाता जागतिक महासता बनू पहात आहे.जगातील सर्व देश एकीकडे तर भारत ही माता असल्याने मातृत्व शक्तीची शक्ती अनोखी व बलशाली असल्याचे मत सुनीता ताई आंधळे यांनी कीर्तन रुपी सेवेच्या माध्यमातून व्यक्त केले.

        नायगाव तालुक्यातील रातोळी येथील कै. बालाजीराव मारोतराव रातोळीकर (पोलीस पाटील) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आ. राम पाटील रातोळीकर यांच्यावतीने रातोळी ता. नायगाव येथे बुधवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्रातील प्रख्यात राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. सौ. सुनिताताई आंधळे यांचा सुश्राव्य प्रबोधनपर कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या वेळी त्या बोलत होत्या.

या निमित्त नायगाव तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासणारे आमदार राम पाटील रातोळीकर यांनी आपले वडिल बालाजीराव मारोतराव रातोळीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुकन्या समृद्धीयोजने अंतर्गत १००० मुलींची पोस्टाची खाती काढून दिली असून त्याची पासबुक वितरण ही या निमित्त करण्यात आले.

या वेळी विरुपाक्ष महाराज मुखेड,शिवाचार्य महाराज तमलूर, सिद्धद्य दयाळ महाराज बेटमोगरा, नराशाम महाराज येवती, मंहत यदुबन महाराज कोलंबी खा प्रताप पाटील चिखलीकर ,माजी मंत्री भास्करराव पा.खतगावकर,डाँ.माधवराव किन्हाळकर,धनाजीराव देशमुख,नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कृष्णाजी कोकाटे,मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर,तहसीलदार गजानन शिंदे,गटविकास अधिकारी एल आर वांझे,पो.नि.अभिषेक शिंदे,माधवराव पा.शेळगावकर, माजी आ.गंगाराम ठकरवाड, बळवन्त पा.व दिलीप पा बेटमोगरेकर,प्रवीण साले,चैतन्य बापू देशमुख,उमाकांत गोपछडे,माधव आणा साठे, रवींद्र चव्हाण,संभाजी पा भिलवंडे,रवींद्र भिलवंडे,लक्ष्मण ठकरवाड,बालाजी बचेवार,मिलिंद देशमुख,शिवराज पा.होटाळकर,माणिक लोहगावे,कामाजी पा पवार,डाँ.उचेकर,वेंकट पवार,आंबूलगेकर,बाबुराव लगडापुरे,उमाकांत देशपांडे, आदी उपस्थित होते.

15 फेब्रुवारी रोजी साजऱ्या झालेल्या या सोहळ्यात प्रातिनिधीक स्वरुपात या योजनेतील लाभार्थी खातेदारांना मान्यवरांच्या हस्ते पासबुक सुपूर्द करण्यात आले. आई-वडिलांच्या स्मरणार्थ केलेले समाजोपयोगी कार्य, दीन-दुबळ्यांना केलेली मदत हाच पुण्यकाळ आणि ईश्वरसेवा असते. हा दृष्टिकोन मनाशी बाळगून आमदार राम पाटील रोतळीकर यांनी हा आदरांजलीपर पुण्य सोहळा आयोजित केला होता.या सोहळ्यास पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहून सुश्राव्य किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला, आई वडिलांच्या प्रति कृतज्ञता हीच ईशवर भक्ती आहे असे आवाहन करीत आ.राम पाटील रातोळीकर यांनी उपस्थिताचे आभार व्यक्त केले.


संचलन बाळासाहेब पांडे मांजरमकर यांनी केले.कीर्तनाच्या प्रारंभी नरशाम विद्यालय रातोळी च्या लेझीम पथकाने केलेले प्रात्यक्षिक करीत कीर्तनकार आंधळे ताई व वर्षा घुगे मॅडम यांचे स्वागत सर्वात आकर्षक ठरले.मंगला ताई व आ.राम पाटील रातोळीकर यांनी आंधळे ताई यांचे स्वागत केले तर राहुल पाटील रातोळीकर यांनी आरती केली.या नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.नायगाव व मुखेड येथील राजकीय कार्यकर्ते व पत्रकार आदी हजारोच्या संख्येने भक्त गण उपस्थित होते.कार्यक्रम यशस्विते साठी रातोळी व परिसरातील ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.