येणाऱ्या दोन वर्षांत गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना चालू करु – भास्करराव पा. खतगावकर

2,093

 

नरसीफाटा/शेषेराव कंधारे 

कै.शंकररावजी चव्हाण यांच्या आदिपत्त्याखाली मी कित्येक वर्ष मंत्री खासदार आमदार म्हणून राजकारणात असताना सामान्य जनतेच्या कल्याणासाठी काम केले परंतु पैशाचा कधीच मोह केला नाही परंतु तीन वर्षा पासून जे राजकारणात आले ते मात्र आज तीन तीन कारखाने खरेदी करण्याच्या गोष्टी करत आहेत मी जर मनात आणलं असतं तर काहीही करू शकलो असतो परंतु वाईट मार्गाने पैसा न कमवता जनतेच्या भल्यासाठी काम केलं पाहिजे ही शिकवण आम्हाला आहे त्यामुळे आम्ही पैशापेक्षा माणुसकीला जोपासतो.

- Advertisement -

 येणाऱ्या दोन वर्षाच्या काळात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बंद पडलेला हा गोदावरी मनात सहकारी साखर कारखाना पुन्हा नव्याने चालू करु असा विश्वास माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर यांनी दि.९ जानेवारी रोजी शंकरनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना दिले.

होटाळा ता. नायगाव येथील सेवानिव्रत भूमिपुत्र विठ्ठलराव योगाजी भद्रे यांनी शंकरनगर येथे नव्याने टाकलेल्या पेट्रोल पंपाच्या शुभारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे, काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर, माजी तालुकाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, सय्यद रहीम,राजु गंदीगुडे, प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे, प्राचार्य बालाजी पिंपळे , माधवराव कंधारे, दिलीपराव पांढरे, हणमंतराव पाटील, गणपतराव पा धुप्पेकर, विठ्ठलराव भद्रे,सौ. विजयमाला भद्रे, रामकिशन योगाजी भद्रे- पोलीस उपविभागीय अधिकारी, निखिल भद्रे, योगेश भद्रे,माधवराव वाघमारे, सदाशिव पाटील डाकोरे, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना खतगावकर म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एका बौद्ध समाजावर उपकार नसून त्यांचे देशातील सर्व मानव जातीवर उपकार आहेत हे कोणालाही विसरता येणार नाही. ज्या काळात बहुजनांना शिक्षणाची सुविधा नव्हती त्या काळात बाबासाहेबांनी एक स्वप्न पाहिले होते की माझे हे गावकुसाबाहेर अशिक्षित असलेला समाज सुशिक्षित होऊन विविध उच्च पदावर जाऊन या देशाचे शासनकर्ते झाले पाहिजे हे बाबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न होटाळकर कुटुंबीय खऱ्या अर्थाने साकार करत विविध क्षेत्रातील उच्च पदावर कार्यरत असून ते आज एका पेट्रोल पंपाचे मालक म्हणून कार्य करण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांच्या या व्यवसायाला मनापासून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शिवराज पाटील होटाळकर,माणिकराव लोहगाव, भास्कर पाटील भिलवंडे, संभाजी पाटील भिलवंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे मान्यवराच्या शुभहस्ते पूजन करून त्रिशरण पंचशीला घेऊन माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या शुभहस्ते पेट्रोल पंपाचे फित कापून शुभारंभ करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठलराव भद्रे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर कांबळे यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार संतोष पाटील पुयड यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.