महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परीचालक कर्मचारी संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी शेषेराव बेलकर तर नायगांव तालुकाध्यक्षपदी रामकृष्ण मोरे उपाध्यक्षपदी गजानन हेंडगे यांची निवड.
नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क…
ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असणारे संगणक परिचालक हे ग्रामपंचायतचा कणा आहेत. ग्रामपंचायत विभागाचे ऑनलाईन कार्य करणाऱ्या, ग्रामीण स्तरावर सेवा सुविधा देणाऱ्या ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेची बैठक 17 जानेवारी रोजी दुपारी बळवंतराव चव्हाण सभागृह पंचायत समिती नायगाव येथे पार पडली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेषेराव बेलकर, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गर्जे, जिल्हा सचिव अंकुश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
जिल्हाध्यक्ष शेषेराव बेलकर यांनी सांगितले की संगणक परिचालकाच्या अडचणी सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. संगणक परिचालकाला येणाऱ्या अडचणी, शासन स्तरावर करण्यात येणाऱ्या मागण्या, तांत्रिक अडचणी सोडणव्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. व मुंबई मंत्रालय बैठकीत जो काही संगणक परिचालक यांच्या आकृती बंधात समाविष्ट करण्याचा विषय झाला त्या संदर्भात मार्गदर्शन केले. राज्यअध्यक्ष गुणवंत राठोड यांच्या नेत्रत्वाखाली संघटनेचा लढा सुरू असून आगामी काही दिवसात आपणास नक्कीच अच्छे दिन येतील असा विश्वास व्यक्त केला. पुढील बैठकीमध्ये कार्यकारणीचा विस्तार होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शेषेराव बेलकर यांनी जाहीर केले आहे.
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या नायगांव तालुका अध्यक्षपदी रामकृष्ण मोरे तर उपाध्यक्षपदी गजानन हेंडगे, सचिव पदी हणमंत कोकुर्ले, सहसचिव बापूराव शिंदे, कोषध्यक्ष साहेबराव ढगे, संपर्कप्रमुख किरण शिंदे, मालिकार्जून कुंभार, प्रसिद्धी प्रमुख मालू कांबळे, सर्कल प्रमुख नागेश जाधव, विश्वाबर शिंदे, संदीप गुंठे, मारोती कदम, सदस्यपदी प्रल्हाद आडकीने, सविता मोरे, संगीता रहाटे, गंगाराम पांचाळ, संभाजी उपासे यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली आहे.
बळवंतराव चव्हाण सभागृहात निवड जाहीर झाल्या नंतर ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टी. जी. पाटील रातोलीकर सचिव सूर्यकांत बोडले, तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामसेविका यांनी नवीन कार्यकारणीस शुभेच्छा देऊन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यापुढे ग्रामसेवक संघटना तुमच्या सोबत खंबीर पणे असल्याचे टी.जी.पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गजानन हेंडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण मोरे यांनी केले अभार मालू कांबळे यांनी मांडले यावेळी नायगाव तालुक्यांतील सर्व संगणक परिचालक बांधव उपस्थित होते….