संतांच्या आशीर्वादाने परमात्मा प्राप्त होतो – ज.न.म. कोकणे 

205

 

 

नायगाव/शेषेराव कंधारे 

 

जगद्गुरु श्री.नरेंद्राचार्य महाराज हे कल्पतरु आहेत संतांच्या संगतीत राहुन जीवन सफल करुन घ्या संता मुळेच जीवनात चांगला मार्ग मिळतो.भक्ती हाच धर्म आहे . संतांच्या आशीर्वादाने परमात्मा प्राप्त होते मनापासून देवाची भक्ती करा संसार सागराची काळजी करण्याची गरज नाही असे मोलाचे विचार ज.न.म.प्रबोधनकार गंगाधर कोकणे यांनी केले.

- Advertisement -

             अनंतश्री विभूषित जगतगुरू रामानंदाचार्य जगतगुरू श्री.स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा लोहा येथे दि.१२ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता होणार असून त्या कार्यक्रमांचा प्रसार व्हावा त्या अनुषंगाने दि.३ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता नायगाव तालुक्यातील धुप्पा संतसंग सेवा केंद्रात ज.न.म.प्रबोधनकर गंगाधर कोकणे हे भाविक भाविक्ताना भक्तदिक्षा आणि गुरुपुजनाची सविस्तर मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी स्व स्वरूप सांप्रदायाचे नायगाव तालुका अध्यक्ष व्यंकटराव पवारे, किशनराव पा.मोरे, दिलीप सावकार, लक्ष्मण पपुलवाड, इंगळे सर, माधवराव कंधारे, नारायण जांभळे, सुधाकर दरेगावे, अनिल जांभळे,भाऊसाहेब जांभळे,बंडगर, तानाजी शेळगावकर, गोविंदराव शिनगारे, हणमंतराव दरेगावे, बाबुराव कमलेकर, कैलास गर्दनमारे यांसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना कोकणे म्हणाले की सत्संगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीच्या उपक्रमात हजारो नागरिकांचे व्यसनमुक्ती केली आहे व शालेय विद्यार्थ्यांना विनामुल्य विद्यालयीन ते महाविद्यालयीन मोफत शिक्षण दिले जाते. सामाजिक अध्यात्मीक,शैक्षणिक तसेच निराधार महिलांना शिलाई मशिन वाटप, शेतकऱ्यांना कृषि साहित्य वाटप, गायी म्हेस, शेळी वाटप असे अनेक उपक्रम राबविले जातात. कोरोना काळात मुख्यमंत्री व प्रधानमंत्री निधीमध्ये एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली असुन अपघात ग्रस्तांसाठी विनामुल्य तीस रुग्णवाहीका चौवीस तास हायवेवरती सेवा देत आहेत त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत असे अजुनही उपक्रम प्रभावी पणे राबवली जात आहे. याचं बरोबर रक्तदान शिबिर घेऊन लाखो बाटल्या रक्त शासकीय रुग्णालयात जमा करण्यात आले आहे. देहदान, अवयव दान शिबिरे असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. प्रबोधन संपल्यानंतर जगद्गुरु श्री.नरेंद्राचार्याजी महाराजांच्या प्रतिमेची सांज आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आले.यावेळी परिसरातील भजनी मंडळ व भाविक भाविक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.