लोहा येथे होणाऱ्या जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याला नायगाव तालुक्यातुन हजारो भक्त जाणार – पवारे

236

 

नायगाव/ शेषेराव कंधारे

जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नानिजधाम यांच्या पादुका दर्शन सोहळ्यासह विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन गुरुवारी दि.१२ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता लोहा येथे आयोजित करण्यात आले असून या सोहळ्याला नायगाव तालुक्यातुन हजारो भक्त जाणार असल्याचे माहीत स्व स्वरूप सांप्रदायाचे नायगाव तालुका अध्यक्ष व्यंकटराव पवारे यांनी दिली.
संस्थानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये नाणिजधाम येथे शालेय विद्यार्थ्यांना विनामुल्य विद्यालयीन ते महाविद्यालयीन मोफत शिक्षण दिले जाते. सामाजिक अध्यात्मीक,शैक्षणिक तसेच निराधार महिलांना शिलाई मशिन वाटप, शेतकऱ्यांना कृषि साहित्य वाटप, गायी म्हेस, शेळी वाटप असे अनेक उपक्रम राबविले जातात.

- Advertisement -

कोरोना काळात मुख्यमंत्री व प्रधानमंत्री निधीमध्ये एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली असुन अपघात ग्रस्तांसाठी विनामुल्य चौवीस तास रुग्णवाहीका हायवेवरती सेवा देत आहेत त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

दि.१२ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी सिंध्द पादुका पुजन, गुरुपुजन, सामाजिक उपक्रम, आरती सोहळा, प्रवचन, साधकदीक्षा दर्शन, पुष्पवृष्टी व पादुका मिरवणूक निघणार असुन या मिरवणूक कळश धारी महिला, लेझिम पथक, भजनी मंडळ, पताके धारी महिला व पुरुष या सह सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून या सोहळ्याला नायगाव तालुक्यातुन हजारो गुरुबंधू गुरुभगीनी जाणार असल्याचे माहीत स्व स्वरूप सांप्रदायाचे नायगाव तालुका अध्यक्ष व्यंकटराव पवारे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.