सूर्यकांत सोनखेडकरांना स्व. अनिल कोकीळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर.

130

 

 

नरसीफाटा/शेषेराव कंधारे 

 

डॉ शंकररावजी चव्हाण पत्रकारिता पुरस्कार मागील चौदा वर्षांपासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरीत असणाऱ्याना ५ जानेवारी रोजी सह्याद्री रेस्टहाऊस येथे प्रदान करण्यात येणार असून मराठी पत्रकरसंघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांना स्व.अनिल कोकीळ स्मृती पुरस्कार जाहीर झाल्याने त्याच्या वर अभिनंद वर्षाव होत आहे.बहूमानाचा हा पुरस्कार मिळाल्या बदल नायगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा दर्पन दिन कार्यक्रमात शंकरनगर येथे सत्कार करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

- Advertisement -

       नायगाव तालुक्यात मागील ३३ वर्षांपासून माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांतजी सोनखेडकरांनी आपल्या रोखठोक लेखणीच्या माध्यमातून जनसामान्य लोकांना अनेकदा न्याय मिळवून देत कार्यक्षमता नसणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तृत्ववाची जाणीव करून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या बाहेरचा रस्ता वास्तव लिखाण करून दाखविला.

तसेच नायगाव तालुक्यात पत्रकारांच्या हितासाठी व आम्ही आमच्यासाठी याहेतुने आपत्कालीन निधी संकल्प मांडून दोन वर्षांपासून सातत्याने हा निधी जमा होत असल्याने परिषदेचे एस.एम. देशमुख यांनी या उपक्रमाची स्तुती केली असून अनेकदा समाजोपयोगी अन् लोकाभिमुख उपक्रम देखील राबविल्याने अखिल भारतीय मराठी पत्रकारसंघ मुंबई येथील वरच्या पातळीवर नायगाव मराठी पत्रकारसंघास गंगाखेड येथे मराठवाडा स्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त करून देण्यासाठी सुर्यकांत सोनखेडकरांनी महत्वाची भूमिका घेतली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील असंख्य पत्रकारांनी नुतनवर्षाचे औचित्य साधून व पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या कार्यालयास भेट देत नायगाव मराठी पत्रकार संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ पत्रकार सोनखेडकर यांना शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.