बळेगाव येथील ग्रामसेवकाच्या निलंबनासाठी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन.

758

 

नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क

 

नायगाव :  बळेगाव येथील ग्रामसेवकांच्या निलंबनासह, ग्राम रोजगार सेवकाचे मानधन देण्यात यावे आणि बळेगाव येथील नवीन रोजगार सेवकाची निवड रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. १ डिसेंबर पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

     बळेगांव येथील ग्राम सेवक आर. एन. मद्देवाड यांनी 2021 ते 2022 पर्यतचे ग्रामरोजगार सेवकाचे मानधन 1621 रु आध्याप देण्यात आले नाही. तसेच सन 2022 चे मानधन 24795 येवढी रक्कम देय आसताना सुध्दा ग्रामसेवक जाणूनबुजून 21000 हजार चेक देण्यात आला. 3795 चा चेक आद्यापही देण्यात आला नाही यांची चौकशी करण्यात यावे.

बळेगांव येथील ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती सन 2007 पासून आसताना बेलकर रोजगार सेवक यांची नियुक्ती आसताना तो प्रमाणिक पणे काम करीत आसताना सुध्दा नविन रोजगार सेवकाची निवड का करण्या आली. 

    मौ बळेगांव येथे वृझ लागवड व सि.सी रस्ता हे दोनच कामे चालु आसून गावची लोकसंख्या 1200 येवढी आहे. जुन्या रोजगार सेवकाना काम मिळत नसतांना सुध्दा ग्रामसेवकाने शासन निर्णयाला केराची टोपली दाखवून मनमानी कारभार करून नविन रोजगार सेवकाची नियुक्ती केली.

शासन निर्णय नुसार मुदा क्र. 6 मध्ये नमुद केले प्रमाणे शक्यातो एका ग्रामपंचायतीमध्ये एक ग्राम रोजगार सेवक असावा, तथापि ग्रामपंचायत मोठी असल्यास किंवा ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे असल्यास किंवा आदिवाशी व मागास भाग असल्यास किंवा जेथे ग्रामपंचायतीमध्ये जास्त गांवे विखुरलेल्या स्वरुपात असतील तर एकापेक्षा जास्त ग्राम रोजगार सेवक घेता येतील. असे सपष्ट निर्देश दिले असताना ग्रामसेवक मद्देवाड यांनी शासन निर्णयाची मोडतोड नियमबाह्य नविन रोजगार सेवकाची निवड केली. वास्तविक या निवडीसाठी बोगस ग्रामसभा दाखवण्यात आली होते विशेष.

ग्रामसेवक आर. एन. मद्देवाड यांनी रोजगार सेवकाना हाजरी घेण्यासाठी मस्टर न देणे व मस्टर क्र. 4289 व 4290 हे मस्टर सि.सी. रस्त्याचे आसून रोजगार सेवकानी वरिल कामास भेट देवून मजुर कामावर उपस्थीत नसल्यामुळे दोन्ही मस्टर झीरो करण्यात यावे. आसे लेखी अर्ज दिले आसताना सुध्दा मस्टर ऑनलाईन कशाच्या आधारे करण्यात आले असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला असून. बोगस मस्टर आँनलाईन करुन ग्रामसेवक आर. एन. मद्देवाड हे शासनाची दिशा भुल (फसवनुक) करीत आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावे.

मौजे आलुवडगांव, हूस्सा, धानोरा, पळसगांव, येथील रोजगार सेवकाचे मानधन त्याच्या व्यक्तीक खात्यात जमा करण्यात यावे. रोजगार सेवकाना टि.ए.डि. ए. देण्यात यावे अदि मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अशोक बैस, उपाध्यक्ष संताजी पांढरे, सचिव प्रकाश बैलकवाड,रावसाहेब महाजन बेलकर, काँ.देवराव नारे, यादव हनवटे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.