देगलूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका कक्ष देगलूर मार्फत शहापूर येथे “दामिनी”, खानापूर येथे “उड्डाणं” व मरखेल येथे “जिज्ञासू” प्रभागसंगांची निर्मिती.

172

 

नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष देगलूर मार्फत प्रभागसंघ स्थापना करण्याच्या मोहिमेत सदरील 3 प्रभागसंघाची निर्मिती करण्यात आली त्यामध्ये शहापूर येथे “दामिनी”, खानापूर येथे “उड्डाणं” व मरखेल येथे “जिज्ञासू” प्रभागसंगांची निर्मिती करण्यात आली आहे सदरील प्रभागसंघ हे प्रभागावर म्हणजे जिल्हा परिषद गटावर कार्यरत असणार आहेत.

- Advertisement -

या प्रभागसंघांमध्ये त्या त्या प्रभागातील महिला पदाधिकारी म्हणून अध्यक्ष, सचिव, कोषध्यक्ष, लिपिका यांची निवड करण्यात आली आहे. सदरील प्रभागातील MSRLM अंतर्गत कार्यरत असलेल्या समूहांचा समावेश आहे.

या प्रभागसंघांचे कार्यालय व मुख्यालय हे त्या त्या प्रभागामध्ये ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या व उमेद च्या साहाय्याने स्थापन करण्यात येणार आहे. प्रभागातील महिलांचे सामाजिक समावेशन,संस्था बांधणी, क्षमता बांधणी,आर्थिक समावेशन व सक्षमीकारण तसेच कौशल्यविकास साधण्यामध्ये या प्रभागसंघाची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे.

सदरील प्रभागसंघ स्थापणेसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर मॅडम व प्रकल्प संचालक मा डॉ संजयजी तुबाकले साहेब तसेच गट विकास अधिकारी शेखर देशमुख साहेब, गजानन पातेवार साहेब जिल्हा अभियान व्यवस्थापक, द्वारकादास राठोड, गणेश कवडेवार, धनंजय भिसे व जिल्हा कक्षातील सर्व जिल्हा व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन लाभल्याबाबत अमोल जोंधळे यांनी सांगितले.


सदर प्रकल्प अमल बजावणी साठी अमोल जोंधळे तालुका अभियान व्यवस्थापक, बाबू डोळे तालुका व्यवस्थापक, अश्विनी मुंडे प्रभाग समन्वयक व बालाजी गिरी कौशल्य समन्वयक, तसेच मीराबाई शिंदे, गंगामनी थडके, शारदा वजीरे,अभिलाषा वनंजे,ज्योती शहापूरकर,तक्षशीला वाघमारे व देगलूर तालुक्यातील सर्व आयसीआरपी यांनी परिश्रम घेतले.

प्रभागसंघ स्थापणेसाठी उमेद MSRLM अंतर्गत कार्यरत ग्रामसंघांचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.