श्री.भास्करराव बापूराव पाटील खतगावकर स्कूल मध्ये म. गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी.

502

 

नांदेड प्रतिनिधी – तानाजी शेळगावकार

शंकरनगर-येथील श्री. भास्करराव बापूराव पाटील पब्लिक स्कूल व ज्यु. कॉलेज शंकरनगर च्या नामांकित इग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

- Advertisement -

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी. पी..पांडेय यांच्या हस्ते म. गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.अध्यक्षांनी आपल्या अद्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गांधीजी व लाल बहादूर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

भारतीय जनमानसावर म. गांधी यांच्या सत्य आणि अहिंसा या तत्वाचा प्रभाव आहे , भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्यांचा गौरव केला जातो.त्यामुळे त्यांची जयंती साजरी केली जाते जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान त्यांनी शिकवलं अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग त्यांनी सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.गांधीजींनी केलेल्या दांडी यात्रा, भारत छोडो चळवळ सत्य आणि अहिंसा या तत्वावर आधारित आंदोलनांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले त्यांनी सत्य आणि अहिंसा या तत्वाचा पुरस्कार केला नाही तर ते स्वतः सुद्धा ते तत्व जोपासले.आपण पण ती तत्व जोपासून एक कणखर देश बनवण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे असे संबोधित केले. तसेच अतुल फुपरे, स्नेहा भाडंगे, विद्या मोखाडे , देव तिवारी, कार्तिक द्विवेदी, अंश द्विवेदी, अनुसया देशमुखे, या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलन सूर्यवंशी आर.के.आभार श्यामसुंदर जाधव यांनी केले .कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उवस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.